Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

सुरमणी सानिया पाटणकर यांनी गायलेल्या यमनरंगाने पुणेकर रसिक रंगले

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼 शास्त्रीय संगीत सर्व संगीत प्रकारातील गायनाचा मुळ पाया :-सानिया पाटणकर 🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼 भारतीय विद्याभवन व इन्फ...





🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

शास्त्रीय संगीत सर्व संगीत प्रकारातील गायनाचा मुळ पाया :-सानिया पाटणकर



🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

भारतीय विद्याभवन व इन्फोसिस फाउंडेशन सांस्कृतिक प्रसार प्रचार कार्यक्रम अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरमनी सानिया पाटणकर यांनी रंगत आणली, सुरुवातीला सर्व कलाकारांचा इन्फोसिस फाउंडेशन चे श्री नंदु काकिरर्डे यांचे शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यमनरंग या कार्यक्रमात सानिया पाटणकर यांनी सदर कार्यक्रमात गायनातील विविध प्रकार सादर केले, सुरुवातीला धृपद,बडा ख्याल,त्याला जोडून प्रसिद्ध बंदिश मेरी आली पिया बिन गाऊन शास्त्रीय संगीताची अप्रतिम तयारी रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेली,त्यानंतर अनेक संतांच्या अभंगरचना नामाचा गजर, सुंदर ते ध्यान,पायोजी मैने राम रतन धन पायो, श्रीरामचंद्र कृपाळ,टाळ बोले चिपळीला,अशा अभंगाने वातावरण भक्तिमय झाले, त्यानंतर देवा घरचे ज्ञात कुणाला,नाथ हा माझा,राधा धर जय मिलिंद जय अशा नाट्यगीतांनी कार्यक्रम सुंदर उंचीवर चढला,त्यानंतर यमन रागातील भावगीते, चित्रपट गीतांनी बहार आणली,नवीन तरुण पिढीला प्रेरणा मिळेल असा कार्यक्रम यशस्वी झाला,त्यांना तितकीच तोलामोलाची अप्रतिम साथसंगत प्रणव गुरव (तबला)अभिनय रवंदे (हार्मोनियम) ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज)दयानंद घोटकर (निवेदन)व शिष्यांनी स्वरसाथ केली, पुण्यातील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏