Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

न्यू इंग्लिश स्कूल, करकंब च्या वतीने सीए कृष्णा माळी यांचा सन्मान

  करकंब: चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, करकंब या प्रशालेचा माजी विद्यार्थी कृष्णा हनुमंत माळी यांनी सीए च्या परीक्षेमध्ये घवघवी...

 


करकंब: चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, करकंब या प्रशालेचा माजी विद्यार्थी कृष्णा हनुमंत माळी यांनी सीए च्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल प्रशालेतर्फे त्यांचा सत्कार आयोजित केला होता. या समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून अनगर केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव माने  हे उपस्थित होते तर संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे सर, सचिव देवकते सर, स्कूल कमिटी अध्यक्ष वेळापूरकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना माने यांनी कृष्णा माळी यांचे कौतुक करताना प्रयत्न केल्यानंतर यश नक्की मिळतेच हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यापर्यंतचा इतिहास मुलांना सांगून मुलांनी स्वप्न पाहावीत व स्वप्न पाहत असताना ती सत्यात उतरावीत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे सांगितले. तसेच अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे यांनी कृष्णा माळी यांच्या माळी परिवाराच्या कष्टाचे,संस्काराचे आज हे यश आहे, हे सांगितले. सचिव देवकते सर यांनी सुद्धा कृष्णा माळी यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण माळी कुटुंब,बाळासाहेब घाडगे,प्रशालेच्या मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम, सुपरवायझर शिंदे मॅडम, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सुपरवायझर शिंदे मॅडम यांनी मांडले तर सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले.

Advertise