Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पखवाज वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना पुण्यातील आर्ट बिटस् संस्थेचा "महाराष्ट्र कला सन्मान " राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

  " संगीत "या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे यांचेकडून  कलाकारांना सन्मानित करण्यास...


 

" संगीत "या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे यांचेकडून  कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येतो. ज्ञानेश्वर दुधाने यांचे संगीत सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गायक कलाकार त्यामध्ये पं शौनक अभिषेकी,पं रोणू मुजूमदार, विदुषी मंजुषाताई पाटील विदुषी आरतीताई अंकलीकर,पं जयतिर्थ मेऊंडी, यांना पखवाज साथ केली असून महाराष्ट्राबरोबर, दिल्ली, जम्मू काश्मीर, हरियाना,गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक,आदी राज्यांत पं शौनक अभिषेकी यांचे समवेत पखवाज साथ केली आहे,तसेच नादब्रह्म कला फाउंडेशन वतीनं शास्त्रीय संगीताचा प्रसार प्रसाराच काम पंढरपूर व करकंब येथे करतात, पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ही अनमोल योगदान ज्ञानेश्वर दुधाणे यांचे आहे,

 या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की एकूण सहा कला विभागात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात यातून विशेष कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.

   आर्ट बिटस् ही संस्था गेली एकवीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला आशा सर्वच विभागातील कला कलाक्षेत्रातील कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने अनेक उपक्रम राबविले जातात.

  या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कलाकारांसाठी एक सर्वात मोठा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहचली जाते.