Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी प्रशालेतील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी केली गुरु पौर्णिमा साजरी विद्यार्थ्यांनी केला गुरुजनांचा सत्कार..

        करकंब..13जुलै     ‌‌                                गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम ...





       

करकंब..13जुलै     ‌‌                               

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम..

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य...

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..           ‌.                                    

 डी.ए.व्ही. रामभाऊ जोशी प्रशालेतील स्काऊट गाईड विभागाच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी केले. सत्कार कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रशालेचे  पर्यवेक्षक धनवंत करळे, ज्येष्ठ शिक्षक नरसिंग एबोते, विनय कुलकर्णी, नागेश घुले, सुरेश दहिगिरे, महादेव पुजारी, अतुल अभंगराव, मनीषा ढोबळे, संजय पाटील, मिथुन चंदनशिवे, शुकूर बागवान,पवार मॅडम या सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. या सत्कार कार्यक्रमात प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत कराळे गणित विषय शिक्षक नागेश घुले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट शिक्षक महादेव पुजारी, सुरेश दहिगिरे,शुकूर बागवान यांनी केले.

आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्व गुरूजनांना वंदन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिक्षण क्षेत्रात सर्वात पवित्र काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना गुरूपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..