Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

तीन दिवसीय श्री चौंडेश्वरी कोष्टी समाजाच्या भावई उत्सवास करकंब मध्ये उत्साहात सुरुवात

तीन दिवसीय श्री चौंडेश्वरी कोष्टी समाजाच्या भावई उत्सवास करकंब मध्ये उत्साहात सुरुवात ३जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे कर...

तीन दिवसीय श्री चौंडेश्वरी कोष्टी समाजाच्या भावई उत्सवास करकंब मध्ये उत्साहात सुरुवात


३जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन


प्रतिवर्षाप्रमाणे करकंब मध्ये कोष्टी समाज बांधवांच्या वतीने जेष्ठाची आमावशा व पौष पौर्णिमा हे दोन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.कोरोनाच्या महामारी संकटामुळे दोन वर्ष हा भावई उत्सव साजरा होऊ शकला नाही,आता हा उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो आहे.या तीन दिवसीय उत्सवास आज दिनांक २८ वार मंगळवार रोजी पहिल्या दिवशी चौंडेश्वरी मातेचा अभिषेक समस्त कोष्टी समाज बांधवांना टेंभुर्णी येथील संतोष रसाळ परिवाराच्या वतीने सुहासिनी भोजन (समाकूळ) आयोजित करण्यात आले आहे.दिनांक २९ वार बुधवार दुसऱ्या दिवशी चौंडेश्वरी मातेच्या भावई मुखवट्याची मिरवणूक सकाळी ११वा.निघणार असून मिरवणुकीत सामील होण्यासाठी करकंबकर भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात लहान मुले महिलावर्ग ते वयस्कर व्यक्ती या आनंदी सोहळ्यात सहभागी होतात,तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ३ जुलै रविवार रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत श्री चौंडेश्वरी मंदिरात भावई उत्सवा निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून करकंब व करकंब पंचक्रोशीतील सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चौंडेश्वरी मंदिर ट्रस्ट व समस्त कोष्टी समाज बांधव अधिक परिश्रम घेत आहेत.