Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

मुक्तीलाही मुक्त करण्याच सामर्थ्य भक्तीत आहे: जयवंत महाराज बोधले

करकंब: सद्गुरू भजलिंग महाराज उटीपूजा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवशीय प्रवचन मालेत दुसऱ्या दिवशीच्या पुष्पमालेत बोलत होते. विश्वस...

करकंब:

सद्गुरू भजलिंग महाराज उटीपूजा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवशीय प्रवचन मालेत दुसऱ्या दिवशीच्या पुष्पमालेत बोलत होते.

विश्वस्त श्री राजू देशपांडे यांचे शुभहस्ते आदरणीय जयवंत महाराज बोधले यांच स्वागत करुन प्रवचन मालिकेला सुरुवात झाली.

 माणकोजी महाराज यांना प्रत्यक्ष पांडूरंगाची भेट झाल्यानंतर पूर्ण आयुष्यच पालटून गेला कोण्याही जीवाचा न घडो मत्सर या भावनेने सर्वत्र परमेश्वर रुपी वास्तव्य दिसू लागले,पंढरीरायाचे वेड लागले,घरामध्ये मोठे बंधू शिवाजी महाराज त्यांची पत्नी गिरजाबाई,माहेर चोरखळी माणकोजी महाराज त्यांची पत्नी ममताई माहेर रायरास संसारामध्ये कधी कधी सुख तर कधी कधी दु:ख येत होत शिवाजी महाराजांची पत्नी गिरिजाबाई आपण आता इथ राहायच नाही हट्टापायी दोघ निघून गेली माणकोजी महाराजांचही ऐकल नाही,आपल्या पुढे काय होणार याची चिंता म्हणजे संसार आणि पुढे काय होणार माहीत नाही याच नाव परमार्थ,संसारात राहून सुध्दा माणकोजी महाराजांची वृत्ती हरीरुप झाली होती,त्यावेळी चिंतनामध्ये सध्या कीर्तनकारांनी कीर्तन मर्यादा कशी पाळावी याविषयी धोंडोपंतदादा फडावरील कीर्तनाचे नियम सांगितले, कीर्तन चांग कीर्तन चांग मन होय हरीरुप,कीर्तन हे मनोरंजनाचे साधन नसून आत्मोध्दाराचे साधन आहे. त्यामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य याविषयी च बोलावे,मृदंगसाधकानेही मृदंग हाच आपला परमेश्वर म्हणून त्याची मनोभावे सेवा करावी.मृदांगाच अंग मृत असून सुध्दा सर्वांना भजनात दंग करतो तो मृदंग अस वर्णन केले. तिरुपती वित्तब्रह्म.उडपीचा कृष्ण  अन्नबह्म.आणि पंढरीचा पांडुरंग नादब्रह्म आहे,तेंव्हा धामणगावची कीर्तन सेवा शिवाजी महाराज निघून.गेल्यामुळे माणकोजी महारजांनवर आली पण किर्तन येत नसल्याने ते घाबरुन झोपी गेले प्रत्यक्ष पांडूरंग तिथे आले आणि जा कीर्तन कर अशी आज्ञा केली.प्रत्यक्ष पांडुरंग मागे पुढे असताना किर्तनही  अतिशय मधूर झाले,नंतर किर्तनाची गोडी वाढू लागली,त्यावेळी माणकोजी महाराजांच्या समकालीन संत तुकाराम महाराज, शेख महम्मद, निंबराज महाराज असत त्यांच वेळी माणकोजी महाराजांना एकच तळमळ लागली होती मला गुरुउपदेश करा त्यावेळी पांडूरंगाने सांगितले की मांडण्य विरुपाक्ष भारती ते  तुला अनुग्रह देतील तिथ तू जा आणि तिच परंपरा भजलिंग महाराजां पर्यंत आलेली आपणास दिसून येते,परिस्थिती अनुकूल असली आणि नसली तरी नामस्मरण सोडू नये,ज्ञानपूर्व भक्ति,ज्ञानयुक्त भक्ती,आणि ज्ञानोत्तर भक्ती याचे तिन प्रकार अतिशय सुंदररित्या उदाहरण देत समजून सांगितले, ज्ञान म्हणजे मुक्ती भक्ती म्हणजे यशोदा.चांगल्यालाच वाईट दिवस येतात याच उदाहरण देताना म्हटले जीवनात जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा असते जो काहीच करत नाही तो मात्र टुमटुमीत असतो,लखमोजी,यमाजी,आणि विठोजी ही तीन पूत्र परिस्थिती बेताची झाल्याने कर भरायला पैसे मिळेनात त्याच वेळीनागाऊ कडून ३होन कर्ज घेण्यासाठी महाराज आले पण मिळाले नाही, त्याचवेळी प्रत्यक्ष लहानरुपात येऊन  पांडूरंगाने कर भरला,आणि माणकोजी महारांना करमुक्त केले,समाधान संसारात असणाऱ्या वस्तूमध्ये नसून  वृत्तीच्या स्थिरतेत आहे,प्रपंचात वस्तू मिळाली की इच्छा वाढते परमार्थात मात्र इच्छाच राहत नाही त्यामुळे अशा आयोजित केलेल्या प्रवचन मालिका ऐकाव्यात तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे सांगून दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा संपन्न झाली याचवेळी धनश्री पतसंस्था चे सर्वेसर्वा  शिवाजीराव काळुंगे सरांच स्वागत बाळासाहेब वास्ते यांचे वतीनं करण्यात आले. यावेळी करकंब मधील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.आज प्रवचन मालिकेचा तिसरा दिवस संध्याकाळी ६:००वा प्रवचन सुरु होईल सद्गुरू भजलिंग महाराजांची उटीपूजा आज दुपारी संपन्न होईल सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले.