Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे"शुन्य सावली" दिवसाचे प्रात्यक्षिक सादरीकरण

करकंब.... शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटासाठी आपल्याला सोडून जाते म...

करकंब....

शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा असून या दिवशी वर्षभर सोबत राहणारी आपली सावली काही मिनिटासाठी आपल्याला सोडून जाते महाराष्ट्रात येत्या 3 मे ते 30 मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

मे महिन्यात वेगवेगळ्या तारखांना सोलापूर जिल्ह्यातील विविध शहरात,गावात दुपारी 12.30वा शुन्य सावलीचा दिवस अनुभवता येणार आहे. त्यावेळेस कोणत्याही वस्तूंची सावली काटकोनात राहणार आहे अर्थात यावेळी उभ्या वस्तूची सावली काही क्षणांसाठी दिसणार नाही.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या शून्य सावलीचा अनुभव घ्यावा. यावेळी समांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल किंवा बाटली सरळ उभा ठेवून शून्य सावलीचा थरार अनुभवावा असे आवाहन रामभाऊ जोशी हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी यांनी सांगितले आहे.

      भर दुपारी चालताना आपली सावली ही आपल्याबरोबर चालत असल्याचा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी तरी घेतला आहे, माणसाची सावली ही आपली साथ कधीही सोडत नाही पण निसर्ग आणि भूगोलातील काही शास्त्रीय घडामोडी मुळे सावलीनेही आपली साथ सोडेल्याचा अनुभव मे महिन्यातील 9 व 10 तारखेला पंढरपूर (करकंब) येथे अनुभवता येणार आहे. खगोलीय भाषेत या दिवसाला शून्य सावलीचा दिवस(झिरो सॅडो डे) असे म्हणतात.

         शुन्य सावलीचा दिवस कसा अनुभवावा याचे प्रात्यक्षिक प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पत्रकार विश्वनाथ केमकर, महादेव पुजारी,संजय पाटील, संजय पंचवाडकर, शकूर बागवान, रोहिदास माने, नामदेव सलगर, नवनाथ कवडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक उभे करून दाखवण्यात आले.


आपणही अनुभवु या शुन्य सावलीचा दिवस....

काही क्षण सावलीही आपली साथ सोडणार.... ‌‌