Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा श्री सत्यजीत तांबे यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी! सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष गणेश ननवरे यांची मागणी

विधानसभेतून निवडून द्यायच्या एका राज्यसभेच्या जागेवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील यांना निवडून द्यावे ...


विधानसभेतून निवडून द्यायच्या एका राज्यसभेच्या जागेवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील यांना निवडून द्यावे अशी मागणी सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांची आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे नेते खा राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे निरीक्षक एच के पाटील, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना इमेल द्वारा कळवण्यात आले आहे.

  सत्यजीत तांबे पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले, विधानसभा निवडणुकीच्या वेळ काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळत असतानाही त्यांनी ते तिकीट नाकारून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून विविध विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा, बाईक  रॅली, कोपरा सभा, होम टू होम अभियान असे नवनवीन व अभिनव उपक्रम राबवून प्रचार केला. सत्यजीत तांबे यांच्या सुपर 60 उपक्रमामुळे कॉंग्रेस पक्षाचे 28 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले.

सत्यजीत तांबेंच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सुपर 1000 उपक्रम हाती घेण्यात आला आणि त्याद्वारे महाराष्ट्रातील युवक-युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यातले अनेक जण विजयी झाले, त्यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा सत्यजीत तांबे यांचा होता.

केंद्र शासनाच्या महागाई विरोधात दादांनी विविध प्रकारची आंदोलने महाराष्ट्रामध्ये केली.

महाराष्ट्र मध्ये काँग्रेस पक्षात युवकांना आकर्षित करायचा असेल तर माननीय श्री सत्यजीत दादा तांबे पाटील यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला पक्षाने न्याय देण्याची भूमिका पार पाडावी तेव्हा महाराष्ट्रातील युवक हा काँग्रेस पक्षाकडे आशेने पाहिल व काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होतील. म्हणूनच राज्यसभेसाठी सत्यजीत तांबे यांना संधी मिळावी ही महाराष्ट्रातील युवकांची मागणी आहे.