Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

एकनाथ महाराज पालखी विसाव्याला नाही आता सभामंडप.

करकंब प्रतिनिधी. श्री संत एकनाथ महाराजांची पालखी विसावा स्थळ येथे नरसिंह मंदिर मध्ये अनेक वर्षापासून चौकात पालखी विसावा असतो. पावसामुळे नरसि...

करकंब प्रतिनिधी.

श्री संत एकनाथ महाराजांची पालखी विसावा स्थळ येथे नरसिंह मंदिर मध्ये अनेक वर्षापासून चौकात पालखी विसावा असतो.

पावसामुळे नरसिंह मंदिर सभामंडप पडझड झाली होती. त्या पडझडीची पाहाणी गट विकास अधिकारी  काळे, तहिसलदार बेलकर, सरपंच तेजमाला पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख  एडवोकेट शरद चंद्रपांढरे, ग्राम विकास अधिकारी सतीश चव्हाण, तलाठी भाऊसाहेब  खडतरे माजी उपसरपंच अशोक नागरस इतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून ते धोकादायक नरसिंह मंदिराचा सभामंडपाचे पाडण्याच्या सूचना दिल्या.

या सभामंडपासाठी अनेक वर्षापासून आमदार फंडाकडे ग्रामपंचायतचे सदस्य सचिन शिंदे यांनी मागणी केली पाठपुरावा केला आहे .मात्र अद्याप पर्यंत भरीव निधी कोणता आला नाही.

यावर्षी मुक्काम स्थळे तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती सरपंच तेजमाला पंढरे सोय केली जाईल असे असली तरी कायमस्वरूपी निवारा व बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी सभामंडप लवकरात लवकर उभारावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून व वारकरी संप्रदायातून होत आहे.

पालकमंत्री दत्तामामा भरणे व आमदार बबन दादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांनी विशेष लक्ष देऊन त्या नरसिंह मंदिरासाठी भरीव निधी देऊन लवकरात लवकर हे सभामंडप बांधून निवारा उपलब्ध करून द्यावा आणि सर्वसामान्य नागरिक बाजारकरी व वारकऱ्यांची सोय करावी.

करकंब येथील रस्त्याचे अतिक्रमण रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे, दिवाबत्तीची सोय, शौचालयाची सोय, वारीदरम्यान होणे गरजेचे आहे कारण या मार्गावर अनेक साधू संतांच्या पालख्या येत असतात.मंदिरा बरोबर इतर सेवा सुविधा देण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावे एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, गजानन महाराज इ्., देवगड, शिर्डी येथून आणि इतर शंभर ते दीडशेहून अधिक दिंड्या मुक्कामी करकंब मध्ये असतात. लाखोंच्या संख्येत वारकरी असतात. त्यासाठी सेवा सुविधा मात्र कमी पडत असते. भरीव निधी व सेवा साधनांकडे अधिकारी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पालखी मार्गावर गावात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.