Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

माऊली ज्ञानेश्वर दुधाणे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

रामभाऊ जोशी हायस्कूलचे हुशार व होतकरू तीन विद्यार्थ्यीनींचा शैक्षणिक खर्चासाठी घेतले दत्तक करकंब येथील प्राथमिक शिक्षक,पखवाजवादक,संकल्पक करक...

रामभाऊ जोशी हायस्कूलचे हुशार व होतकरू तीन विद्यार्थ्यीनींचा शैक्षणिक खर्चासाठी घेतले दत्तक

करकंब येथील प्राथमिक शिक्षक,पखवाजवादक,संकल्पक करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान,स्वच्छता दुत जागर टीमचे व एकलव्य अभ्यासिकेचे कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करकंब मधील विविध शाळामधील गरीब,होतकरु,आणि हुशार मुलांच्या शिक्षणाचा वर्षभराचा पूर्ण खर्च करुन ११मुले दत्तक घेऊन एक वेगळा वाढदिवस करकंब मध्ये साजरा करण्यात आला.

     त्यामध्ये रामभाऊ जोशी हायस्कूलचे कु.पूनम राजकुमार मुखरे,

कु.हर्षदा सतिश खताळ,कु.साक्षी सचिन मुजमुले,या मुलांच्या शिक्षणाचा वर्षभराचा पूर्ण खर्च करण्यात येणार असून दप्तर,वह्या,गणवेश,आण वर्षभरात लागेल ते शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे, एक जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकीची भावना तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सदैव ज्ञानेश्वर दुधाणे यांचा सिंहाचा वाटा असतो त्याचवेळी वाढदिवसाच्या निमित्ताने करकंब गावच्या लेकीचं झाड टीम,स्वच्छता अभियान टीम,युगंधर आखाडा तरुण कार्यकर्ते, शिक्षक शिक्षिका भगिनी,श्री राम गणेश मंडळाचे तरुण ,श्रीराम प्रतिष्ठान,आदींनी त्यांचा हार,शाल,फेटा बांधून केक कापून सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशालेतील तीन गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्याची निवड केल्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, स्काउट शिक्षक महादेव पुजारी यांनी ज्ञानेश्वर माऊली दुधाणे सर आणि दुधाणे परीवार यांचे प्रशालेतर्फे आभार मानले आणि ज्ञानेश्वर माऊली दुधाणे सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्य लाभो आणि सर्वांनी  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.