Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

उपक्रमशील मुख्याध्यापक दत्तात्रय खंदारे यांच्या समयसूचकतेने पक्षीमित्रांनी काळा शराटी पक्ष्याचे वाचविले जीव

करकंब.... जिल्हा परिषद मुलींची शाळा क्रमांक 2 येथे अचानक उंच उडणारा पक्षी खाली कोसळल्याने प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय खंदारे,सिद्धेश्व...


करकंब....

जिल्हा परिषद मुलींची शाळा क्रमांक 2 येथे अचानक उंच उडणारा पक्षी खाली कोसळल्याने प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय खंदारे,सिद्धेश्वर लेंगरे यांच्या समयसूचकतेने वसुंधरा पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष हेमंत कदम, समन्वयक पक्षीमित्र महादेव पुजारी यांना फोन करून प्राथमिक उपचार अंती सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पक्ष्याला पाणी पाजून पक्षी मित्रांच्या स्वाधीन केले.

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल प्रशालेच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत कदम समन्वयक पक्षीमित्र महादेव पुजारी यांनी या जखमी पक्ष्यावर योग्य प्राथमिक उपचार करून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

          या पक्षाला काळा शराटी....लाल डोक्याचा कुदळ्या....,काळा अवाक.... असेही म्हणतात.

भारताच्या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळत असून नद्या, तलाव, भातशेतीच्या प्रदेशात तसेच जंगली भागात राहणे याला पसंत असते. जवळच्या भागात आपले खाद्य शोधत फिरतो एकत्र एकाच प्रदेशात राहणे त्याला पसंत आहे. आपला ठरलेला प्रदेश कधीच सोडून अन्यत्र जात नाही. या पक्षाचे खाद्य सरडे,गोगलगाय,बेडूक ,मासोळ्या,लहान साप,सरडे, खेकडे, गांडुळ, विंचू, किडे , टोळ, नागतोड्ये आणि तृणधान्य असे अन्न आहे.जाडजूड बांद्याचा हा पक्षी रंगाने काळा, चोच कुदळे सारखा असल्याने त्याला कुदळ्या असेही म्हणतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावे आहेत.

  हा बगळा वर्गीय पक्षी महाराष्ट्रातील असून तो स्थलांतरीत नाही.पर्यावरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा पक्षी असल्याचे पक्षीमित्र महादेव पुजारी यांनी सांगितले.

प्राथमिक उपचारांती निसर्गात सोडून देतानाचे आनंद प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनीही अनुभवला.