Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

साप्ताहिक दीपज्योती संचलित पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षा रामभाऊ जोशी हायस्कूल येथे संपन्न

करकंब 2मे :-     करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथे पी टी एस परीक्षा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.    करकंब येथी...

करकंब 2मे :-

    करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथे पी टी एस परीक्षा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.

   करकंब येथील पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षा केंद्राचे उद्घाटन करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, प्राचार्य हेमंत कदम, पी.टी.एस परीक्षा केंद्रसंचालक विश्वनाथ केमकर, सहाय्यक केंद्र संचालक महादेव पुजारी, पत्रकार मनोज पवार, पत्रकार अतुल अभंगराव,पत्रकार लक्ष्मण शिंदे, दत्तात्रय खंदारे, सुनील आडगळे,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

              करकंब येथील या परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थानां उत्तम बैठक व्यवस्था, सर्व विद्यार्थ्यांना वाटर फिल्टर पाण्याची सोय प्रशालेने उत्कृष्ट केली होती, या परीक्षा केंद्रावर एकूण अकरा वर्गामध्ये विद्यार्थी बैठक व्यवस्था करून अभिषेक चोपडे, संजय पाटील, मिथुन चंदनशिवे, प्रदीप पवार, अमित शिंदे, गोविंद मोहिते, माधव कांबळे, अश्विनी शिंगटे, मुखरे, जाधव, यानी पर्यवेक्षक म्हणून काम केले. परीक्षेस करकंब व पंचक्रोशीतील विविध शाळेतील भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विविध माध्यमिक प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या उपस्थित पी टी एस परीक्षा मोठ्या दिमाखदार पद्धतीने, उत्साही वातावरणात घेण्यात आले.