Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शेतकरी राजानं आईवडीलांना कधीच वृद्धाश्रमात पाठवल नाही : जयवंत महाराज बोधले

करकंब:-सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या उटीपूजे निमित्ताने १ मे ते ३मे सद्गुरू माणकोजी महाराज बोधले चरित्र चिंतन या विषयावर प्रवचनमालेचा शुभारं...

करकंब:-सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या उटीपूजे निमित्ताने १ मे ते ३मे सद्गुरू माणकोजी महाराज बोधले चरित्र चिंतन या विषयावर प्रवचनमालेचा शुभारंभ झाला असून सुरुवातीला श्री. ज्ञानेश्वर दुधाणे यांचे शुभहस्ते स्वागत करुन प्रवचनमालेला सुरुवात झाली. त्यावेळी जयवंत महाराज बोलत होते की प्रत्येक वृद्धाश्रमात जाऊन पहा त्या आईवडीलांना विचारा प्रत्येक आईवडीलांचा मुलगा उच्चशिक्षित व श्रीमंत आहे परंतु त्यांनी आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवलय ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे त्यांनी युवकांना अवाहन केलयं आईवडीलांना दु:ख देऊन कधीही कोण सुखी होणार नाही. 

आई वडील देव आहेत त्यांची सेवा करा हे सांगत असताना कुळाचार, आराध्य देवता याची नियमित पूजा केली पाहिजे, जगताप (बोधले)घराणे मुळचे सासवडचे परंतू कुलदैवत आई तुळजाभवानी मातेच्या द्रुष्टांताने ते धर्मन्यपूर येथे वास्त्यव्यास आले तिथं त्यांना त्यांच्या तिथं केलेल्या कामगिरी मुळ भालजी जगताप यांना पाटीलकी देण्यात आली. आणि ते त्या गावचा कारभार पाहू लागले,नंतर मोठे भाऊ शिवाजी... यांच्या आज्ञेने एक दिवस पंढरपूच्या पाटलांच्या पाटलाला भेटायचय चल म्हटले आणि माणकोजी महाराज पंढरपूर मध्ये दाखल झाले,पाटलांची भेट घेतल्या शिवाय जाणार नाही असा पण केला आणि काही दिवसात च प्रत्यक्ष पांडुरंगानी साक्षात दर्शन दिले तेंव्हपासून माणकोजी महाराज पांडूरंगा चरणी लीन झाले. आणि पुढील आयुष्य फक्त आणि फक्त पांडुरंगासाठीच असा पण केला.हे सांगत असतानाच प्रपंच सुखी अरायचा असेल तर या सहा गोष्टी महत्वाच्या आहेत सांगितले पैसा,आरोग्य, प्रेम करणारी पत्नी,गोड बोलणारी पत्नी, आज्ञाधारक मुलगा,आणि अर्थार्जन होण्यासाठी एखादी कला.एवढ असेल तर मनुष्य जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. करकंब मधील युवकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करताना त्यांनी युवक कोणाला म्हणायच ते सांगताना म्हटले की यु युधीष्ठीर व वशिष्ठ क कर्ण....युधिष्ठीरा सारखी सत्यता,वशिष्ठ ऋषी सारखे ज्ञान आणि कर्णासारखी दानशूरता ज्याच्या अंगी असेल तो खरा युवक,.माणसानं जगत असताना तारुण्याश्रम,संसाराश्रम,वानप्रस्थाश्रम, आणि संन्यासाश्रम या काळात मनुष्याने कधी पळायच कधी थांबायच हे मनुष्यास कळल पाहिजे तरच तो सुखी होऊ शकतो त्यासाठी त्याला भक्तीरुपी आध्यात्माची आवश्यकता असून पुढील चरीत्र ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन बाळासाहेब वास्ते, राजू देशपांडे, सर्व विश्वस्त व सेवक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.