Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूल मध्ये सन 94 -95 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न; शिक्षकांचा मान सन्मान करत स्नेह मेळावा संपन्न

करकंब.... स्नेह मेळावा म्हणजे....  ‌‌.         घट्ट मैत्रीचा पुरावा..... दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज 94- 95 माजी व...

करकंब....

स्नेह मेळावा म्हणजे....

 ‌‌.         घट्ट मैत्रीचा पुरावा.....

दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज 94- 95 माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या दिमाखदार उत्साहात संपन्न झाला.

या दिमाखदार सोहळ्यात सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्याने अतिशय सुंदर व नेटक्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 94- 95 मध्ये इयत्ता दहावी तील विद्यार्थ्यांना शिकवण्यात असलेले सर्व शिक्षक-शिक्षकेतर गुरुजनांचे भव्य सत्कार करून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक तुळशीदास गायकवाड, संजय मळेगावकर , राजाराम गव्हाणे, कालिदास शिंदे, राजश्री शिंदे, नरसिंग एबोते,केरबा भाजीभाकरे,पोपट खरे ,इ गुरूवर्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व जणांनी जेवणाचा आस्वाद घेतला. प्रतिबिंब सामाजिक संस्कृतीक मंडळाच्या वतीने विविध कसरतीचे कौशल्य दाखवण्यात आले. या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रमात प्रशालेस आकर्षक व सुंदर डायस टेबल भेट देण्यात आले.

      ‌या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कार्यक्रमाचे संयोजक,आयोजक बाळासाहेब घाडगे, संजय व्यवहारे,नागेश घाटुळे सतिव झाडबुके स्वाती देशमुख, अश्विनी खोटे, दीपक शिंदे, दीपक नरोटे, निरुपा बरीदे, गणेश दुधाणे, मोहन धायगुडे, विजय शिंदे, जयश्री शिंदे, सोनाली कुरणावळ , रागिनी गुटाळ, बाहुबली रणदिवे, विनोद कसबे, कुंडलिक लोंढे,सोमनाथ वंजारी, संतोष माने,रामचंद्र कापसे , मोतीराम जाधव, नाना शिंदे, धनाजी धडे, संभाजी लिंगे, दत्तात्रय अहिरे, सतीश दुधाळ आदी उपस्थित होते.