Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात पंढरपूर तालुक्यातील शिक्षकांचं बहारदार सादरीकरण ; महाराष्ट्र दिनानिमित्त पूर्वसंध्येला जि.प.सोलापूर यांचे वतीनं सुंदर आयोजन

सोलापूर : १मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग यांचे वतीने हुतात्मा मंदिर सोलापूर येथे,मा.श्री. दिलीप स्व...


सोलापूर :

१मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग यांचे वतीने हुतात्मा मंदिर सोलापूर येथे,मा.श्री. दिलीप स्वामी (सी ई ओ) व किरण लोहार (शिक्षणाधिकारी प्राथ.) यांच्या संकल्पनेतून बहारदार महाराष्ट्राची लोकधारा हा सर्वांगसुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते,श्री. दिलीप स्वामी,मुख्य लेखाधिकारी विजय पवार,किरण लोहार,डॉ. नसीमा पठान, भास्कर बाबर (शिक्षणाधिकारी माध्य.)सर्व गटशिक्षणाधिकारी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रास्ताविक मा.किरण लोहार यांनी करुन मा.दिलीप स्वामी व जिल्हाधिकारी श्री. मिलिंद शंभरकर यांनी मार्गदर्शन केले.सर्व शिक्षक कलाकारांना शुभेच्छा दिल्या व सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक शिक्षिकांच्या बहारदार कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पंढरपूर तालुक्यातील शिक्षक शिक्षिकांनी गायलेल्या समूहगीत त्यामुध्ये खरा तो एकची धर्म बलसागर भारत होवो,बहु असोत सुंदर. आणि जयोस्तुते यां.गीतांच्या मेडलेंनी देशभक्तीचे उत्साही वातावरण निर्माण केले,आणि मा.दिलीप स्वामी यांनी भरभरून कौतुक केले.यानंतर तेजस्विनी सातपुते, किरण लोहार, आणि दिलीप स्वामी यांनी ही सुंदर गाणी गाऊन वन्समोअर घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शिक्षक शिक्षिकांनी एकापेक्षा एक बहारदार सादरीकरण केले,पंढरपूर मधील  समूहगीताची संकल्पना ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करुन विकास कांबळे,दयानंद चव्हाण, शांताराम गाजरे,राणी शंकर,देवकी दुधाणे, अर्चना परचंडराव,सारिका फासे,सुवर्णा टकले,अनिता माने,वैशाली साळुंखे,मंगल माने,या सर्व शिक्षिक शिक्षिकांशी सहभाग नोंदवला होता,यावेळी भास्करराव बाबर,(शिक्षणाधिकारी)श्री. महारुद्र नाळे (गटशिक्षणाधिकारी) मल्हारी बनसोडे साहेब, भांजे साहेब गुरव साहेब,आदी सर्वांनी सुंदर सादरीकरण केल्या बद्दल अभिनंदन केले....या संपूर्ण कार्यक्रमाच सूत्रसंचन जयश्री सुतार मँडम व महेश कोटीवाले यांनी बहारदार केले.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शिक्षक शिक्षिका उपस्थित राहून बहारदार कार्यक्रमाचा आनंद घेतला.या कार्यक्रमाला निश्चितच प्राथमिक शिक्षकांना एक नवी प्रेरणा मिळाली असून याचा नक्कीच पुढील शैक्षणिक वर्षात चांगला उपयोग विद्यार्थ्यांसाठी करतील याचा विश्वास वाटतो.प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच आयोजन केले जाते.