Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

"माझी शाळा,माझे आरोग्य" : आर.जे. हायस्कूल येथे जागतिक आरोग्य दिन साजरा

  "माझी शाळा,माझे आरोग्य"  आर.जे. हायस्कूल येथे जागतिक आरोग्य दिन साजरा करकंब.... दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी...

 


"माझी शाळा,माझे आरोग्य" 

आर.जे. हायस्कूल येथे जागतिक आरोग्य दिन साजरा

करकंब....

दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व डी.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु काॅलेज ‌येथे "आरोग्यम धन संपदा....." जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला.

7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य स़घटनेची स्थापना करण्यात आली.1950पासून दरवर्षी सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.आज वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक,मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे म्हणून आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल येथे प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे यांच्या मार्गदर्शनाखाली "माझी शाळा, माझे आरोग्य" याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

       यावेळी करकंब ग्रामीण रूग्णालयाचे आरोग्य सेवक लादे यांनी सर्व विद्यार्थ्यांना कोवीड लस घेण्याविषयी,लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.

       राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी यांनी विद्यार्थ्यांनां वाढत्या उष्णतेच्या त्रासापासून उन्हाळ्यात व्हीटॅमिन सी ऑंटीऑक्सीडेंट पैकी एक आहे.त्यामुळे संत्री,आवळा, टोमॅटो, लिंबू इत्यादी व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्त्रोत असलेली फळे खावे असे सांगितले. लसीकरण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.

    या जागतिक आरोग्य दिनानिमित्त अतुल अभंगराव, नागेश घुले, अभिषेक चोपडे, संजय पाटील यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली.

     यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.