Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे वाढत्या उष्णतेच्या लाटेबद्दल विद्यार्थी प्रबोधन प्रात्यक्षिक सादर उष्णतेची लाट.... सावधान....सावधान....करकंबकरानो, विद्यार्थ्यांनो सावधान....

करकंब येथे वाढत्या उष्णतेच्या लाटेबद्दल विद्यार्थी प्रबोधन प्रात्यक्षिक सादर उष्णतेची लाट.... सावधान....सावधान....करकंबकरानो, विद्यार्थ्यांन...

करकंब येथे वाढत्या उष्णतेच्या लाटेबद्दल विद्यार्थी प्रबोधन प्रात्यक्षिक सादर

उष्णतेची लाट.... सावधान....सावधान....करकंबकरानो, विद्यार्थ्यांनो सावधान....

करकंब....

सोलापूर जिल्ह्यात मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागात उष्णतेची लाट निर्माण झाली  असताना हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शालेय विद्यार्थ्यांनी उन्हापासून कसे संरक्षण करावे. हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंशावर पोचले आहे करकंबकरानां देखील वाढत्या उष्णतेची सामना करावा लागत आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथील स्काऊट गाईड विभाग, राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळातील विद्यार्थ्यांनी वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.

  ‌‌     सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत आहे, तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना कोणती दक्षता घ्यावी इत्यादींची माहिती सांगण्यात आली.

       ही परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्याने दुपारी विनाकारण फिरणे टाळून जास्तीत जास्त सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा, पांढरे कापड परिधान करावे, टोपीचा वापर, डोळ्यांची काळजी घ्यावी व त्वचेचे संरक्षण कसे करावे, ताक,नारळपाणी, टरबूज,कलिंगड यांचे सेवन करावे. उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी स्कार्फ कसे बांधावे यांचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.

या कार्यक्रमात प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे यांनी विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी यांचे मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत कदम यांच्या उपस्थितीत यशस्वी झाले.यावेळी पर्यवेक्षक धनवंत करळे,विनय कुलकर्णी,संजय पंचवाडकर, नागेश घुले, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते. 



     या कार्यक्रमाचे आयोजन स्काऊट शिक्षक, वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी यांनी केले,तर अतुल अभंगराव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.