Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

न्यू इंग्लिश स्कूल करकंब मध्ये पुस्तकांची ज्ञानरूपी गुढी उभा करून मराठी नूतन वर्ष साजरे

अभ्यासाची आस आम्हाला, ज्ञानाची कास धरू यशाचे शिखर गाठाया  पुस्तकाची गुढी उभारू !!🚩 📕📗📘📚📚📘📗📙 याच विचारांचा ध्यास घेऊन चेतना विकास मं...




अभ्यासाची आस आम्हाला, ज्ञानाची कास धरू

यशाचे शिखर गाठाया 

पुस्तकाची गुढी उभारू !!🚩

📕📗📘📚📚📘📗📙

याच विचारांचा ध्यास घेऊन चेतना विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल करकंब येथे भारतीय संस्कृतीने सांगितलेले नवीन वर्ष अर्थात  गुढीपाडवा यानिमित्त प्रशालेमध्ये ज्ञानाची गुढी उभा करून भारतीय संस्कृतीचे नवीन वर्ष साजरे करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत सावता माळी विद्यालय अरण चे माजी प्राचार्य श्री यशवंत शिंदे सर पत्रकार लक्ष्मण शिंदे संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रेसर सचिव देवकते सर पुणे डायट च्या माजी अधिकारी सौ लोहकरे मॅडम प्रशालेच्या मुख्याध्यापिका करमाळकर मॅडम सुपरवायझर शिंदे मॅडम ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री बापू शिंदे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रशालेने अनेक ऐतिहासिक पुस्तकांची गुढी करून गुढी च्या शिरपेचात भारतीय संविधान हा महान ग्रंथ मुकुट मनी म्हणून ठेवण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना लोहकरे मॅडम यांनी ज्ञानाच्या गुढीतून सर्वांनी ज्ञानाचे अमृत प्राशन करून ज्ञानवंत किर्तीवंत जयवंत होण्याच्या शुभेच्छा दिल्या व शाळेच्या या ज्ञान रुपी गुढी उभा करण्याचा जो संकल्प आहे तो अतिशय प्रेरणादायी असा आहे अशा शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी प्राचार्य शिंदे सर म्हणाले की "माझ्या शालेय जीवनातील आजचा ज्ञानरूपी गुढीचा कार्यक्रम अविस्मरणीय व मनाला एक वेगळाच आनंद देणारा आहे" अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सुपरवायझर शिंदे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले.