Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब: रामभाऊ जोशी हायस्कूल येथे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेस सुरूवात

करकंब:- दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेस विविध गावांतील विद्यार्थ्यी सहभागान...


करकंब:-

दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेस विविध गावांतील विद्यार्थ्यी सहभागाने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

      या शासकीय चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन पटवर्धन कुरोली प्रशाला पटवर्धन कुरोली प्रशालेचे चित्रकला शिक्षक नामदेव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खेडभोसे विद्यालयाचे चित्रकला शिक्षिका श्रीम.एच.पी.दिक्षित,न्यू इंग्लिश स्कूलचे करकंबचे रवींद्र झमखडे, योगेश गायकवाड, इंग्लिश स्कूल घोटीचे शिक्षक उपस्थित होते.

  करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल केंद्रक्रमांक109006या परीक्षा केंद्रावर  एलेमिंटरी व इंटरमिजिएट परीक्षा चार दिवस होणार आहे.या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, महादेव पुजारी, नागेश घुले,विनय कुलकर्णी,संजय पाटील, सुरेश दहिगीरे, मिथुन चंदनशिवे, प्रदीप पवार, ज्ञानेश्वर कुंभार, सोमनाथ माने,शुकूर बागवान,रमेश कविटकर, अर्जुन भंडारे, गायकवाड सर,माने सर, विविध सहभागी शाळेचे चित्रकला शिक्षक, प्रशालेचे शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.