Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

   करकंब प्रतिनिधी - करकंब येथील सामाजिक कार्यकर्ते मजूर शेतकरी कामगार वर्ग यांच्यासाठी नेहमीच अहोरात्र झटणारे मनोज पवार यांची भारतीय जनता प...

 

 करकंब प्रतिनिधी - करकंब येथील सामाजिक कार्यकर्ते मजूर शेतकरी कामगार वर्ग यांच्यासाठी नेहमीच अहोरात्र झटणारे मनोज पवार यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सोलापूर कामगार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख व जिल्ह्याचे मा .आमदार प्रशांतराव परिचारक बाळासाहेब देशमुख राहुल काका पुरवत लक्ष्मीकांत वंजारी महादेव कुलकर्णी अनंत शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.तसेच या प्रसंगी करकंब शहर अध्यक्ष म्हणून महादेव कुलकर्णी यांना ही पत्र देण्यात आले.

 भविष्यकाळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे केंद्राच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणार असल्याचे मनोज पवार यांनी सांगितले.