Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी प्रशालेत " मिशन नवोदय" अंतर्गत कार्यशाळा संपन्न

करकंब..,.. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था संचलित करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेत नवोदय विद्...करकंब..,..
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था संचलित करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी "मिशन नवोदय" अंतर्गत विविध प्रकारच्या सराव प्रश्नपत्रिकेचे मार्गदर्शन व माहिती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, मूल्यमापन पद्धती, ओ एम आर उत्तर पत्रिका लेखन याविषयीचे विद्यार्थ्यांनसाठी कार्यशाळा संपन्न झाले.
        प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे यांच्या मार्गदर्शनाने प्रशालेतील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विभाग प्रमुख महादेव पुजारी, नवोदय गणित विभाग प्रमुख संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता, अंकगणित आणि भाषा विभाग याविषयीची माहिती आणि विविध प्रश्नसंचाचे सराव घेण्यात आले.

मिशन नवोदय अंतर्गत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या विविध प्रकाशनाची पुस्तके, प्रश्नपत्रिकेचा सराव घेतला जातो. या उपक्रमामुळे दरवर्षी प्रशालेला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळविता येते.

    यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत कराळे, महादेव पुजारी, संजय पाटील, सुरेश दहीगीरे उपस्थित होते.
सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐