Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती शाळेत शाळापूर्व तयारी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

श्री.अशोक माळी यांचे कडून शाळेसाठी रोख ८०००/-रुपयाची  देणगी करकंब:- आज जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा प...


श्री.अशोक माळी यांचे कडून शाळेसाठी रोख ८०००/-रुपयाची  देणगी





करकंब:- आज जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) येथे शाळापूर्व तयारी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला होता.सुरुवातीला प्रभात फेरी काढून शैक्षणिक वातावरण निर्मिती करुन नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन अध्यक्ष दीपक वसेकर,अशोक माळी साहेब,कांतीलाल वसेकर,बिभिषण वसेकर,विनोद वसेकर,हनुमंत वसेकर,मल्हारी वसेकर,सर्व उपस्थित महिला व मुख्याध्यापक किरण ढोबळे,आदींच्या शुभहस्ते केले.प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करुन दाखलपात्र विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करुन ७ स्टाँल द्वारे शैक्षणिक साहित्य मांडणी केली, शारीरिक विकास,बौद्धिक विकास,भाषा विकास, भावनिक विकास, गणनपूर्व तयारी,आदी बाबतीत उपस्थित पालक व मातांना समजून सांगितल्या, तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांच औक्षण करुन त्यांच गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.पालक,विद्यार्थी आणि विद्यार्थी मिळून सातत्यपूर्ण शाळेसाठी काम केल तर निश्चितच शाळेचा विकास होतो,हे आपल्या शाळेच ज्वलंत उदाहरण असून जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता पुर्ण बनण्यासाठी पालकांचही सहकार्य अपेक्षित असून नक्की करतील.त्याचवेळी अशोक माळी यांनी शाळेसाठी रोख ८०००/-शंकर माळी यांनी रोख १०००/-देणगी दिल्या बदद्ल शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला,यावेळी अनेक माता पालक त्यामध्ये विद्या वसेकर,अश्विनी माळी,वर्षा वसेकर,दिपाली टेके,जयश्री माळी,सविता वसेकर,रुपाली माळी,पद्मिनी माळी,आदी महिला उपस्थित होत्या.गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे केंद्रप्रमुख कपीनंदन कांबळे, यांनी शुभेच्छा दिल्या.आभार मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी मानले.