Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथील डी.ए.व्ही.संकुलात महात्मा हंसराज जन्मदिवस साजरा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 करकंब:- दि.19एप्रिल.... भारतीय समाज सुधारक आणि आर्य समाज चळवळीचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे अनुयायी *"मह...

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

करकंब:- दि.19एप्रिल....

भारतीय समाज सुधारक आणि आर्य समाज चळवळीचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे अनुयायी *"महात्मा लाला हंसराज"* यांचा जन्मदिवस डी.ए.व्ही.शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेज येथे जयंती उत्सव संपन्न झाला.

   यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम ‌यांनी  दयानंद अँग्लो वैदिक विद्यालयाचे संस्थापक आर्य समाजाचे प्रमुख समाजसुधारक, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, महात्मा लाला हंसराज यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली.

स्काऊट शिक्षक महादेव पुजारी यांनी महात्मा लाला हंसराज यांनी देशाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रबोधनाकडे नेण्याचे काम केले.त्यांच्या सेवा, त्याग, साधेपणामुळे लोक त्यांना महात्मा म्हणत असे सांगितले.

           दयानंद आर्य वैदिक शाळा आणि महाविद्यालयाचे साखळी देशभर पसरलेली जगातील डी.ए.व्ही. संस्था सर्वात मोठी गैरसरकारी शैक्षणिक संस्था आहे. महात्मा हंसराज यांनी जे उपदेश केले ते आयुष्यभर आचरणात आणले. संध्या(वैदिक प्रार्थना), स्वाध्याय, समाज सत्संग, स्वदेश, सेवा हे त्यांचे पाच उपदेश होते. या जयंती उत्सव निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महात्मा हंसराज प्रतिमेस पुष्पार्पण करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

       या जन्मोत्सव कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक धनवंत करळे,विनय कुलकर्णी, संजय पंचवाडकर, अभिषेक चोपडे, संजय पाटील, मनिषा ढोबळे, अश्विनी शिंगटे, प्रदीप पवार,शुकूर बागवान, मिथुन चंदनशिवे, गणेश गायकवाड, नामदेव सलगर, रोहिदास माने, नवनाथ कवडे प्रशालेतील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.