Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प.प्रा.शाळा मुले क्र 2 करकंब येथे शाळा पुर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

करकंब: दिनांक 19/04/2022 रोजी जि. प. प्राथ.शाळा मुले क्र 2 करकंब ता पंढरपूर जि सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषद सोला...


करकंब: दिनांक 19/04/2022 रोजी जि. प. प्राथ.शाळा मुले क्र 2 करकंब ता पंढरपूर जि सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळापूर्व अभियान मेळावा क्र 1 राबविण्यात आला.

    या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे आणि शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. अशिष रतीलाल खोटे शा. व्य. समिती उपाध्यक्षा सौ समीक्षा महेश सदावर्ते आणि शाळेच्या  मुख्याध्यापिका श्रीमती.अनिता गोविंद वेळापूरकर यांच्या हस्ते करून करण्यात आली.

 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रविकिरण भास्कर वेळापूरकर यांनी करताना त्यात शाळा पूर्व अभियान नेमका कशासाठी आणि त्याबाबत पालकांनी शिक्षकांनी   कोणती भूमिका घेणे आवश्यक आहे ते सर्व पालकांना समजावून सांगितले.त्यांनतर मुख्याध्यापिका वेळापूरकर मॅडम यांनी प्रास्ताविक करत शाळेची यशोगाथा आणि कार्यपद्धती सांगून विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडवले जाते आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शाळा काय काय प्रयत्न करत आहे ते सर्व पालकांना सांगितले.


  त्यांनतर पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.



  पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची ढोल लेझीम च्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली आणि सदर मेळाव्याचा मुख्य असलेला कार्यक्रम सुरू करण्यात आला. 








टेबल क्र १ 

त्यात सर्वप्रथम प्रत्येक मुलांची नाव नोंदणी श्रीमती अनिता गोविंद वेळापूरकर  यांनी केले.विद्यार्थ्यांची उंची आणि वजन स्वयंसेविका सौ स्नेहल संतोष मेहेरकर यांनी मोजून त्याची नोंद नोंदणी पुस्तकात केली.

टेबल क्र 2

स्वयंसेविका सौ उज्वला उमेश वास्ते यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचा शारिरीक विकासात्मक खेळ घेऊन त्यांच्या योग्य नोंदी केल्या.

टेबल क्र 3

स्वयंसेविका सौ समीक्षा महेश सदावर्ते यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना वस्तूंचा लहान मोठेपणा विचारून जोड्या जुळवायला सांगून त्यांची बौद्धिक क्षमता तपासून त्यांची योग्य नोंद केली.

टेबल क्र ४

स्वयंसेविका सौ.श्वेता विनोद खोटे 

यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, काय चूक काय बरोबर अश्या प्रकारे सामाजिक व भावनात्मक प्रश्न विचारून त्यांची योग्य नोंदी केल्या.

टेबल क्र ५

स्वयंसेविका सौ तेजश्री अमित खोटे

यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना मुळाक्षरे वाचन ,चित्र वाचन करण्यास सांगून आणि गोष्टी सांगण्यास सांगून त्यांच्या नोंदी योग्य प्रकारे केल्या.

टेबल क्र ६

स्वयंसेविका सौ स्वप्नाली प्रफुल्ल शिलवंत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना काही वस्तू देऊन त्या मोजण्यास सांगितले आणि त्यांच्या योग्य नोंदी केल्या.

टेबल क्र ७

स्वयंसेविका सौ दिपाली आनंद देशमुख यांनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याबाबत कश्या प्रकारे जागरूक राहून त्या आपल्या पाल्याची शाळेत जाण्या अगोदर काय काय तयारी करून घेणे आवश्यक ते समजावून सांगितले.

अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नोंदी योग्य घेण्यात आल्या.

नोंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मुलांना आवडणारे कार्टुन शाळेत जाणारा मिकी माउस यासारखेच मी पण रोज शाळेत येणार  म्हणून त्याच्या सोबत फोटो काढून घेतल्या.त्यामुळे मेळाव्यास आलेला प्रत्येक विद्यार्थी मोठया प्रमाणावर खुश आणि आनंदी झाला.

 सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता गोविंद वेळापूरकर, सहशिक्षिका सौ चंद्रकला दत्तात्रय खंदारे, सहशिक्षक श्री रविकिरण भास्कर वेळापूरकर आणि सहशिक्षक श्री बालाजी माणिकराव मुदगडे यांनी अथक परिश्रम घेतले.