Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

प्रगत शिक्षण संस्था फलटण अंतर्गत "पुस्तकमैत्री अभ्यासक्रम" कार्यशाळा संपन्न

  करकंब,:- निंबकर अग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) फलटण येथे11एप्रिल ते 15एप्रिल दरम्यान पुस्तक मैत्री अभ्यासक्रम कार्यशाळा आयोजित करण...

 


करकंब,:-

निंबकर अग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) फलटण येथे11एप्रिल ते 15एप्रिल दरम्यान पुस्तक मैत्री अभ्यासक्रम कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

     या जिल्हास्तरीय कार्यशाळेत 15जिल्हातील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.या कार्यशाळेस रामभाऊ जोशी हायस्कूल करकंबचे महादेव पुजारी, न्यू इंग्लिश स्कूलचे रवींद्र झमकडे  उपस्थित होते.

     वाचन करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी, वाचन प्रक्रियेतील अनेक सुधारणांच्या उपाय,विद्यार्थ्यांचें वाचन दोष दुरुस्ती, वाचनालयाचे महत्व,बुकटाॅक सादरीकरण, वाचन सुधारणा प्रात्यक्षिक, क्षेत्र भेट, पोस्टर निर्मिती व वाचन,डायरी लेखन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आले.

     या पुस्तक मैत्री अभ्यासक्रम प्रमुख प्रसिद्ध लेखिका मंजिरी निंबकर, प्रगत शिक्षण संस्थाचे शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण विभागातील तज्ञ मार्गदर्शिका वंदना कुलकर्णी,मानसिक महाजन,सुजाता लोहकरे, संजिवनी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळा संपन्न झाला.