Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब मध्ये तीन दिवसीय ॲड.डॉ.जयवंत महाराज बोधले यांची सद्गुरू भजलिंग महाराज उटी पूजा निमित्ताने प्रवचनमाला

करकंब : प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या उटीपूजा निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे अक्षय  तृतीया पासून तीन दिवस ख्यातनाम किर्तनानं...


करकंब :

प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या उटीपूजा निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे अक्षय  तृतीया पासून तीन दिवस ख्यातनाम किर्तनानंतर ॲड.डॉ. जयवंत महाराज बोधले यांची श्री संत माणकोजी महाराज चरित्र चिंतन या विषयावर तीनदिवसीय प्रवचन माला  सद्गुरू भजलिंग महाराज मठामध्ये सायं ६:३० ते ८:०० या वेळात होणार असून माणकोजी महाराज व भजलिंग महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारीत अनेक  दाखले ऐकायला मिळणार आहे. करकंब मधील सर्व भाविकभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्ट च्या वतीने बाळासाहेब वास्ते यांनी केले आहे.प्रवचन माला यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी सौ.विद्याताई वास्ते,संजय दुधाणे बंडू वास्ते,राजू देशपांडे,आदीसह.सेवक ज्ञानेश्वर दुधाणे अधिक परिश्रम घेत आहेत.