Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूलच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाच्या वतीने जागतिक चिमणी दिन निमित्ताने कृत्रिम घरटी स्पर्धेचे आयोजन......... चिमणीच्या संवर्धनासाठी मानवी इच्छाशक्तीची गरज - पक्षीमित्र महादेव पुजारी

चिमणीच्या संवर्धनासाठी मानवी इच्छाशक्तीची गरज - पक्षीमित्र महादेव पुजारी करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथील राष...


चिमणीच्या संवर्धनासाठी मानवी इच्छाशक्तीची गरज - पक्षीमित्र महादेव पुजारी

करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत वसुंधरा पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत कदम, समन्वयक महादेव पुजारी यांच्या मार्गदर्शनाने कृत्रिम घरटी स्पर्धेचे आयोजन........

     निसर्गामध्ये अनेक पशुपक्षी, प्राणी आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांच्या अगदी जवळच असलेला, बालगोपाळांपासून ते मोठ्या अबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण ज्याचे बडबड गीत गातात असा पक्षी म्हणजे चिमणी, म्हणजेच आपली चिऊताई. जिच्या संवर्धनासाठी आज "चिमणी दिन" साजरा केला जात आहे. दरवर्षी २० मार्च हा संपूर्ण जगात चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.

         का बरे हा चिमणी दिन साजरा करायची वेळ मानवावर आली ? तर त्यालाही मानवच जबाबदार आहे. आज आपण पाहतो चिऊताई भल्या पहाटे अंगणात दाना टिपण्यासाठी येते. मात्र आता तिची संख्या खूप कमी झाली आहे. शहरात तर या चिमण्या लुप्त होत चालल्या आहेत. मानवाच्या आधुनिकतेची ती पण शिकार होत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. आजवर अनेक कवीं, लेखकांच्या लेखनाचा विषय चिऊताई असायची. मात्र आज तीच चिऊताई जगभराचा विषय झाली असून तिच्या रोडावलेल्या संख्येमुळे.म्हणून चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशालेतील वसुंधरा पर्यावरण मंडळाने कृत्रिम घरटी तयार करण्याचे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये करकंब व परीसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन समन्वयक महादेव पुजारी यांनी केले आहे.

       अनादिकालापासून चिमणी ही मानवाच्या अगदी जवळ होती व आहे. तिचे प्रमुख खाद्य कीटक, धान्य, शिजवलेले अन्न असे आहे. ग्रामीण भागातील प्रामुख्याने जुन्या वाड्यांच्या भिंतीत, कपारीत, घराचे छत आदित ती आपले घरते करते, तसेच अतिशय डेरेदार चिंचेचे झाड, बाभळीचे झाड यावरही ती वास्तव्य करते. मात्र अलीकडे शहराप्रमाणेच खेड्या गावात ही आता सिमेंटची घरे होऊ लागल्यामुळे त्यांचा निवारा कमी होऊ लागला आहे. आधुनिकीकरणासाठी मोबाईल टावरची संख्या वाढल्याने त्यांच्या तरंगलहरीमुळे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक रेन्जच्या संपर्कामुळे त्याचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात चिमण्या मृत्यू पावत आहेत, असे एका संशोधनात आढळले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा परिणामही त्यांच्या वास्तव्यावर होत आहे. शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरल्यामुळे कीटकांना खाल्यानंतर चिमणीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे आज सर्वसामान्यांच्या जवळ असलेली चिमणी दुर्मिळ होत चालली आहे.

      मात्र तिच्या संवर्धनासाठी आता जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा होऊ लागला आहे. लोकांमध्ये चिमणी बद्दल जनजागृती घडवून आणून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती पुढे येऊ लागले आहे. त्यासाठी घराघरातून, शाळांमधून तिच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे. तिच्या वास्तव्यासाठी कृत्रिम घरे, दानापाण्याची सोय तसेच तिच्याबद्दल समाज माध्यमांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. चिमणी हा मानवासाठी अतिशय महत्त्वाचा पक्षी असून वेळीच तिच्या संवर्धनासाठी मानवाने स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. 

(स्पर्धकांनी तयार केलेले टिकाऊ घरटे 23मार्च प्रर्यंत महादेव पुजारीसर 9604199001 रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब यांच्याकडे जमा करावे)

स्पर्धा निकाल 24मार्च रोजी जाहीर होईल

करकंब येथील वसुंधरा पर्यावरण मंडळाच्या वतीने

 "मुठभर धान्य - घोटभर पाणी"

आपल्या पर्यावरणातील पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आदीचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे, यासाठी करकंब येथील वसुंधरा पर्यावरण मंडळ प्रयत्नशील आहे. वसुंधरा पर्यावरण मंडळाने यावर्षी *"मुठभर धान्य - घोटभर पाणी"* हा उपक्रम सुरू केला आहे. फेब्रुवारी महिना संपला की उन्हाळ्याची चाहूल लागते. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी दाणापाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. म्हणून या पर्यावरण मंडळाने रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्ष्यांच्या संवर्धनात विषयी जनजागृती केली आहे. या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या अंगणात, टेरेसवर त्याच प्रमाणे घरासमोरील झाडांवर पक्ष्यांसाठी दाणापाणी ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पक्ष्यांसाठी दाना पाण्याची व्यवस्था करतात. यातूनच भविष्यामध्ये चिमण्यांची संख्या वाढण्यास हातभार लागेल.