Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे कृत्रिम घरटी स्पर्धेचे निकाल जाहिर ; रामभाऊ जोशी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा उपक्रम

करकंब येथे कृत्रिम घरटी स्पर्धेचे निकाल जाहिर रामभाऊ जोशी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा उपक्रम  करकंब.... कर...

करकंब येथे कृत्रिम घरटी स्पर्धेचे निकाल जाहिर


रामभाऊ जोशी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा उपक्रम 

करकंब....

करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत वसुंधरा पर्यावरण मंडळाने आयोजित  कृत्रिम घरटी स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घरट्याचे परीक्षण करण्यासाठी अरण येथील संत सावता माळी विद्यालयाचे माजी प्राचार्य यशवंत शिंदे, प्राचार्य हेमंत कदम, संगीत विशारद व व्यंगचित्रकार संजय पंचवाडकर, निसर्ग निरीक्षक सुरेश दहीगीरे, यांनी उत्कृष्ट परीक्षण केले.यामध्ये....

1) कौस्तुभ मनोज पवार  

प्रथम क्रमांक 

रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब

2) कु.श्रेया संतोष माने 

द्वितीय क्रमांक 

न्यु इंग्लिश स्कूल, करकंब

3) कु.स्वेता सिताराम सुतार

तृतीय क्रमांक 

रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब

उत्तेजनार्थ

१)कु. श्रद्धा नागेश गारूडे

२)कु. श्रावणी दिलिप माने(जि.प.बोचरेवस्ती)

३)कु.निधी शिवाजी टकले (जि.प.मुली क्र२)

४)कु.गौरी रमेश ढोबळे

५) युवराज रामचंद्र जाधव

६)कु.जानकी रविंद्र गळीतकर

   या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

      आता चिमण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. शहरात तर या चिमण्या लुप्त होत चालल्या आहेत. आज तीच चिऊताई जगभराचा विषय झाली असून तिच्या रोडावलेल्या संख्येमुळे.म्हणून चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशालेतील वसुंधरा पर्यावरण मंडळाने कृत्रिम घरटी तयार करण्याचे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये करकंब व परीसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे 

समन्वयक महादेव पुजारी यांनी आवाहन केले होते.

       खेड्या गावात ही आता सिमेंटची घरे होऊ लागल्यामुळे त्यांचा निवारा कमी होऊ लागला आहे. आधुनिकीकरणासाठी मोबाईल टावरची संख्या वाढल्याने त्यांच्या तरंगलहरीमुळे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक रेन्जच्या संपर्कामुळे त्याचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात चिमण्या मृत्यू पावत आहेत, असे एका संशोधनात आढळले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा परिणामही त्यांच्या वास्तव्यावर होत आहे. शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशक वापरल्यामुळे कीटकांना खाल्यानंतर चिमणीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे आज सर्वसामान्यांच्या जवळ असलेली चिमणी दुर्मिळ होत चालली आहे.

              स्पर्धा परीक्षक यशवंत शिंदे यांनी घराघरातून, शाळांमधून तिच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे. तिच्या वास्तव्यासाठी कृत्रिम घरटे, दानापाण्याची सोय तसेच तिच्याबद्दल समाज माध्यमांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. चिमणी हा मानवासाठी अतिशय महत्त्वाचा पक्षी असून वेळीच तिच्या संवर्धनासाठी मानवाने स्वत: पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले.

                  फेब्रुवारी महिना संपला की उन्हाळ्याची चाहूल लागते. त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी दाणापाण्याचे, घरट्याची दुर्भिक्ष जाणवते. म्हणून या करकंब येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाने करकंब परीसरातील विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्ष्यांच्या संवर्धनात विषयी जनजागृती करण्यासाठी घरटी बांधणे स्पर्धा अंतर्गत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या अंगणात, टेरेसवर त्याच प्रमाणे घरासमोरील झाडांवर पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  या उपक्रमामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे स्पर्धेत सहभाग घेतला.यातूनच भविष्यामध्ये चिमण्यांची संख्या वाढण्यास हातभार लागेल.


यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे,परीक्षक यशव़ंत शिंदे,अशोक खपाले, महादेव चव्हाण, सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.