Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

"नादब्रह्म" कला फाउंडेशन करकंब आयोजित चित्रकला स्पर्धेत रामभाऊ जोशी हायस्कूलचे सुयश

करकंब:- नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब आयोजित कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे व कै. पुष्पा नारायण दुधाणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य चित्रकला स्प...


करकंब:-

नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब आयोजित कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे व कै. पुष्पा नारायण दुधाणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले.करकंब व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील विविध शाळेतील जवळजवळ ४५०विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे परीक्षण पंढरपूर येथील ख्यातनाम चित्रकार श्री. भारत गदगे, कलाशिक्षिका सौ. विद्या रेपाळ, पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेचे कलाशिक्षक श्री. सागर थिटे, यांनी संपूर्ण चित्रकला स्पर्धेचे परीक्षणाचे काम केले.

या स्पर्धेतील मोठ्या गटामध्ये प्रशालेतील

१)कु.दिपिका उमेश वागज.....द्वितीय क्रमांक ७५०रू रोख सन्मानचिन्ह

२)कु.श्रावणी श्यामराव भुसारे. उत्तेजनार्थ २५०रू रोख व सन्मानचिन्ह

३)कु. धनश्री शिवराम घाणे उत्तेजनार्थ २५०रू रोख व सन्मानचिन्ह

४)कु.नुपूर दिलिप दुधाणे उत्तेजनार्थ २५०रू रोख व सन्मानचिन्ह मिळवून यश संपादन केले.

 .      या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे स्काऊट शिक्षक महादेव पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.

        या यशस्वी विद्यार्थ्यांना जि.प.सदस्या सौ.रजनीताई देशमुख, करकंबचे सरपंच सौ. तेजमालाताई पांढरे,श्री.शरदचंद्र पांढरे, ख्यातनाम चित्रकार भारत गदगे, कलाशिक्षिका विद्या रेपाळ, कलाशिक्षक सागर थिटे, ज्ञानेश्वर दुधाणे,देवकी दुधाणे, मुख्याध्यापिका केमकर मॅडम, मुख्याध्यापिका गुळमे मॅडम, चंद्रकला खंदारे मॅडम यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

      यासर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, शालेय व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.