Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

करकंब प्रतिनिधी.... दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ संपन्न झाला. ...

करकंब प्रतिनिधी....

दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ संपन्न झाला.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे, इयत्ता दहावी चे विषय शिक्षक नागेश घुले, सुरेश दहीगीरे,विनय कुलकर्णी,गणेश गायकवाड, अतुल अभंगराव, महादेव पुजारी, मनिषा ढोबळे, अश्विनी शिंगटे, वंदना म्हेत्रे, मिथुन चंदनशिवे, प्रदीप पवार,शुकूर बागवान,माने सर, सरगर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

     ‌यावेळी इयत्ता दहावी चे विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या विद्यार्थ्यांनी प्रशालेस आकर्षक डायस टेबल भेट दिली.या कार्यक्रमास धनवंत करळे, सुरेश दहीगीरे, महादेव पुजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत कदम यांनी आपले मैलीक विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभारप्रदर्शन करून स्नेहभोजनाने कार्यक्रमची सांगता झाली.