Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प.प्राथ.शाळा गायकवाडवाडी अरण, येथे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

जि. प. प्राथ. शाळा गायकवाडवाडी(अरण)ता माढा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी *डॉ. सौ. शकुंतला खडके, डॉ. सौ.मन...

जि. प. प्राथ. शाळा गायकवाडवाडी(अरण)ता माढा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी *डॉ. सौ. शकुंतला खडके, डॉ. सौ.मनिषा दळवी व सरपंच सौ.सुरत्नप्रभा ताकतोडे* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून माता पालक व मुलींच्या रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. 


शाळेतील विद्यार्थ्यीनींनी तयार केलेल्या वारसा अमुचा कर्तृत्वाचा या भित्तीपत्रकाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनीनी महिला प्रधान गीतांवर नृत्य सादरीकरण केले. तसेच विविध विषयांवर भाषणे सादर केली. 

थोर महिलांच्या वेशभूषा करून आलेल्या छोट्या मुली कार्यक्रमाच्या आकर्षण ठरल्या. 

मार्गदर्शन करताना डॉ. मनिषा दळवी यांनी महिलांच्या आरोग्याच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन केले. तर *डॉ. शकुंतला खडके* मॅडम यांनी शिक्षण हाच महिलांच्या जीवनाचा उद्धार करण्याचा मार्ग असल्याने  पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले. 

सरपंच सौ.सुरत्नप्रभा ताकतोडे यांनी शाळेच्या भौतिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले तसेच शाळा विकासासाठी ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल असे सांगितले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नवनाथ सावंत यांनी शाळा विकासाची यशोगाथा आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली.केंद्रप्रमुख डॉक्टर श्री.विलास काळे यांनी शाळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये अग्रेसर असल्याचे प्रतिपादन केले.तसेच यावेळी आशाताई सौ.रुक्मिणी वसेकर यांचा अतिउत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.यशवंतदादा शिंदे,श्री समाधान जाधव,ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना अंगणवाडी सेविका सौ.अश्विनी गवळी यांच्याकडून बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष्या सौ.भाग्यश्री अशोक गायकवाड यांनी भूषविले. शाळेच्या मुख्याध्यापिका  श्रीमती सुनीता राडकर यांनी सूत्रसंचालन केले तर सहशिक्षक श्री.अभिजित चवरे यांनी आभार व्यक्त केले. 


    कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुणे, उपस्थित पालकवर्ग,महिला आणि विद्यार्थी यांना अल्पोपहार देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नवनाथ सावंत,माजी अध्यक्ष श्री शरद सावंत,पालक श्री.अजय सावंत,श्री. गौतम सावंत, श्री.महारुद्र पावणे,श्री धनाजी सावंत आदींनी परिश्रम घेतले.