Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि.प.प्रा. शाळा लोकरे वस्ती,करकंब शाळेची वार्षिक तपासणी संपन्न..

आज दिनांक 9/3/2022 रोजी जि प प्रा शाळा लोकरे वस्ती शाळेची वार्षिक तपासणी करकंब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आप्पासाहेब माळी साहेब यांनी केली ...

आज दिनांक 9/3/2022 रोजी जि प प्रा शाळा लोकरे वस्ती शाळेची वार्षिक तपासणी करकंब केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आप्पासाहेब माळी साहेब यांनी केली .

तपासणी करताना प्रत्येक वर्गाची गुणवत्ता पडताळणी करण्यात आली.

लोकरे वस्ती शाळेने मुलांची उत्कृष्ट जपल्याचे साहेबांनी सांगितले .

1)इयत्ता-1ली च्या.वर्गातील सर्व विद्यार्थानी मराठी, व इंग्रजी कविता कृतीयुक्त लयबद्ध, पद्धतीने गायन केले. अंक ओळख गणित बेरीज वजाबाकी क्रिया चटणन मुलांनी क्रिया करून दाखवली. त्याबद्यल मुलांचे कौतुक साहेबांनी केले.

2) इयत्ता-2री..च्या विद्यार्थीना मराठीचे वाचन,लेखन करण्यास लावले असता प्रत्येक मुलांनी समजपूर्वक आणि स्पष्ट वाचन केले. तसेच दोन अंकी संख्येचे वाचन करण्यास व लिहण्यास सांगितले. असता मुलांनी अचूक वाचव व लेखन केले. काही मुलांनी इंग्रजी शब्द ,व वाक्य वाचून दाखवले.त्यांनी मुलांचे व वर्ग शिक्षकांचे कौतुक करून अमूल्य असे मार्गदर्शन केले व सूचना दिल्या.

इयत्ता-3री च्या..विद्यार्थीना गणित  विषयातील बेरीज वजाबाकी मापन इ.

मराठी कविता वाक्य वाचन इंग्रजी कविता गायन त्याबद्यल  साहेबांनी मुलांचे कौतुक करून योग्य मार्गदर्शन केले. 

इ.4थी ...विद्यार्थीना मराठी विषयांतील परिच्छेद वाचन करण्यास सांगितले मुलांनी स्पष्ट वाचन केले.व गणित विषयांतील अपूर्णांक या घटकावर प्रश्न विचारून विद्यार्थीनी घटकावरील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.साहेबांनी विद्यार्थ्यांना शाबासकी देऊन  कौतुक केले.

एकंदरीत विद्यार्थांची गुणवत्ता उत्तम आहे असल्याचे सांगून साहेबांनी शिक्षक वर्गांचे अभिनंदन केले.


  सर्व शालेय रेकॉर्ड, अभिलेखे शिक्षक व विद्यार्थी रेकॉर्ड तपासणी असता सर्व रेकॉर्ड अद्यावत असल्याचे दिसून आले. तसेच शालेय परिसर वर्ग खोल्या किचन शेड ,मुख्याध्यापक खोली  

शौचालय  किचन शेडमधील सर्व साहित्य स्वच्छ व सुंदर आढळून आली .त्याबदल साहेबांनी लोकरे वस्ती शाळेतील शिक्षक नागनाथ घाटुळे व विनोद सावंत यांचे अभिनंदन केले.


शालेय परिसरांतील झाडे व स्वच्छता पाहून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.