Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

विद्या विकास मंडळाचे,पंढरपूर संचलित बालक मंदिर सेमी इंग्रजी माध्यम शाळेची पुन:श्च सुरवात

पंढरपूर येथील विद्या विकास मंडळाचे,पंढरपूर संचलित बालक मंदिर सेमी इंग्रजी माध्यम शाळा आज दिनांक ०७/०३/२०२२ सोमवार रोजी सुरु करण्यात आली. कोर...


पंढरपूर येथील विद्या विकास मंडळाचे,पंढरपूर संचलित बालक मंदिर सेमी इंग्रजी माध्यम शाळा आज दिनांक ०७/०३/२०२२ सोमवार रोजी सुरु करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांनंतर पालकांच्या आग्रहास्तव बालक मंदिर सुरू करण्यात आले. या वेळी संस्थेचे सदस्य प्राथमिक विभाग प्रमुख श्री.विलास विठ्ठल भातलवंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व संस्था सदस्य श्री.अनिल अभंगराव सर,संस्थेचे सदस्य व ग्राहक पंचायत जिल्हा संघटक श्री.शशिकांत हरिदास, संस्था सदस्य सौ.कोर्टीकर स्मि.स. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर यांनी केले.

      या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.डांगे बा.ज.,सदस्य श्री.गर्गे अ.बा.,श्री.मिरासदार,श्री.गंगाखेडकर,श्री.डांगे ह.ज.,श्री.डांगे.न.पा. हे उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.खिस्ते गि.र. यांनी केले तर आभार सौ.शेळके क.स.यांनी मानले. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालक मंदिर शिक्षिका व प्राथमिक विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.