Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

प्रत्येक यशस्वी स्त्री मागे तिचे पूर्ण कुटुंब असते : सीमाताई परिचारक

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान,पंढरपूर व माधवानंद तरुण मंडळ, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश...

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान,पंढरपूर व माधवानंद तरुण मंडळ, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम, गोपाळपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा.सीमाताई प्रशांतराव परिचारक,मा.प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, संत तनपुरे महाराज ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. शुभांगी तनपुरे व मा.ज्योतीताई खुळे  उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ नागरिकांसाठी डॉ. विश्वासराव मोरे, डॉ. स्नेहा रोंगे व दीपक इरकल यांनी "स्वरसंध्या" हा बहारदार संगीताचा कार्यक्रम सादर केला.यामध्ये अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले.स्वरसंध्या या  कार्यक्रमाचे निवेदन दीपक इरकल यांनी केले. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही कर्तबगार महिलांचा सत्कार याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी केले. 

याप्रसंगी आदर्श माता सौ. सुमन अनिल शिंदे,प्रा. डॉ. मीनाक्षी मुकुंद पवार,प्रा.डॉ. प्राजक्ता वृणाल मोरे,इंजि. ऐश्वर्या राजेंद्र पवार,मुख्याध्यापिका माया धनंजय सांगोलकर यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मा. सीमाताई परिचारक यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉ विश्वासराव मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर होत आहेत. कुटुंबाबरोबर सर्व जबाबदाऱ्या त्या सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते परंतु एका स्त्रीला यश मिळवण्यासाठी, पूर्ण कुटुंबाला तिच्या पाठीशी उभं राहावं लागतं. अशा स्त्रिया निश्चितच आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात, असे विचार त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.प्रेमलता बब्रुवाहन रोंगे यांनीही हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

कार्यक्रमानंतर सर्व ज्येष्ठांसाठी डॉ.विश्वासराव मोरे यांचे वतीने मिष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान व माधवानंद तरुण मंडळ मधील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमासाठी मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री राक्षे, श्री अजीत इरकल,डॉ. वृणाल विश्वासराव मोरे यांनी विशेष सहकार्य केले. 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा.सौ सविता दूधभाते-तरळगट्टी यांनी केले.