Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे "खेलो होली, इक्को फ्रेंडली" ‌होळीउत्सव संपन्न ; रामभाऊ जोशी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा उपक्रम

करकंब येथे "खेलो होली, इक्को फ्रेंडली" ‌होळीउत्सव संपन्न रामभाऊ जोशी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा...

करकंब येथे "खेलो होली, इक्को फ्रेंडली" ‌होळीउत्सव संपन्न

रामभाऊ जोशी हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचा उपक्रम

करकंब........

   करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी हायस्कूल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु काॅलेज येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळ यांच्या वतीने पर्यावरणपूरक होळी उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

       राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळाचे समन्वयक महादेव पुजारी यांच्या मार्गदर्शनाने खेलो होली इक्को फ्रेंडली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हेमंत कदम, प्रमुख पाहुणे जि.प.मुली क्र 2चे उपक्रमशील मुख्याध्यापक दत्तात्रय खंदारे, नवोपक्रमशील शिक्षक सिध्देश्वर लेंगरे, पर्यवेक्षक धनवंत करळे, प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध यांच्या उपस्थितीत होळी उत्सव संपन्न झाला.

    


 प्रमुख मार्गदर्शक सिध्देश्वर लेंगरे  ‌यावेळी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग,निर्मिती, कृत्रिम रंगाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य हेमंत कदम व मुख्याध्यापक दत्तात्रय खंदारे यांनी भष्टाचार, हुंडाबळी, प्रदुषण, अंधश्रद्धा, वृक्षतोड, या वाईट विचारा‌च्या भस्मासुराचा होळी पेटवून दिले.

      यावेळी प्रशालेतील पर्यवेक्षक धनवंत करळे, अतुल अभंगराव, सुरेश दहीगीरे,उमा उत्पात यांनी सर्व विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाचा वापर, पर्यावरणपूरक होळी, कचऱ्याचे होळी करण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले.

  होळी उत्सव साजरा करण्यासाठी प्रशालेतील संजय पंचवाडकर, नागेश घुले,अभिषेक चोपडे,संजय पाटील,शुकूर बागवान, प्रदिप पवार,आश्वीनी शिगटें,माने सर यांनी विशेष सहकार्य केले.

     विनय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे व निसर्ग रक्षणाचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले.