Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ नूतन अध्यक्षपदी पांडुरंग गायकवाड यांची निवड

  शिक्षक लोकशाही आघाडी माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महादेव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  या निवडीची सभा सखुबाई क...

 

शिक्षक लोकशाही आघाडी माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महादेव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची सभा सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी तुकाराम मेटकरी सर होते सोलापूर जिल्हा अध्यक्ष भारत इंगवले यांनी पांडुरंग गायकवाड यांची पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड केली .यावेळी टीडीएफ अध्यक्ष जाजनूरे सर ,नीलकंठ लिंगे, वाघमोडे सर ,बनसोडे सर ,गणेश यादव सर ,संभाजी वागज सर ,रमेश येणेगुरे सर ,सांगोला तालुका अध्यक्ष खटकाळे सर व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचे स्वागत मोहन गायकवाड व उपाध्यक्ष दगडे सर यांनी केले.


पांडुरंग गायकवाड हे सध्या बार्डी येथील विद्यानंद माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत आहेत .त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे .माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार केला यावेळी पोलीस पाटील एडवोकेट नानासाहेब शिंदे, अनिल लोंढे, सागर कवडे ,गणेश लोंढे ,सागर लाटे आदी उपस्थित होते