Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

लतादीदीं च्या स्मृती प्रित्यर्थ पंढरपूर मध्ये नागेश आडगांवकर यांची गायनसेवा; आडगांवकर यांच्या दमदार गायनाने पंढरपूरकर रसिक मंत्रमुग्ध

पंढरपूर:-भारतरत्न लता मंगेशकर कै. पुरुषोत्तम खडके काका यांच्या ८व्या मासिका निमित्त ख्यातनाम गायक श्री. नागेश आडगांवकर यांचे गायन आयोजित करण...


पंढरपूर:-भारतरत्न लता मंगेशकर कै. पुरुषोत्तम खडके काका यांच्या ८व्या मासिका निमित्त ख्यातनाम गायक श्री. नागेश आडगांवकर यांचे गायन आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार भारतरत्न लता मंगेशकर, पं बिरजूममहाराज, किर्ती शिलेदार, पं. रामदास कामत,बप्पी लहरी, डॉ. हेरंबराज पाठक, यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. व मान्यवर आमदार प्रशांतमालक परिचारक,नागेश आडगांवकर, भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर,एस पी कुलकर्णी,माधूरीताई जोशी ज्ञानेश्वर दुधाणे, प्रवीण खडके, यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले.आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तरूण पिढी पुढे येतेय त्यांना निश्चित सहकार्य करू सांगितले. 

सत्कारानंतर उस्ताद रशीद खाँ यांचे शिष्य नागेश आडगांवकर यांच्या शास्त्रीय गायनाला सुरुवात झाली. 

सुरुवातीला राग मधूवंती  गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांनंतर आद पिया की आए,पंढरी नगरी दैवत श्रीहरी,नामाचा गजर गर्जे भिमातिर,आकल्प आयुष्य,ज्या सुखा कारणे ,विष्णूमय जग,शेवटी भैरवीत हेची दान देगा देवा गायली,अशा विविध संतरचना गाऊन पंढरीचा पांडुरंग प्रत्यक्षात समोर ऐकतोय नाचतोय अस वातावरण निर्माण झाले.

 संयमी गायन,ठेहराव,अप्रतिम आलाप,ताना,यांची तयारी पाहून क्षणाक्षणाला उस्ताद रशीद खान यांची आठवण होत होती.त्यांना तेवढीच दमदार व समर्पक साथ हार्मोनियम स्वानंद कुलकर्णी, तबला ज्ञानेश्वर खरात व रोहन शेटे,

पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ धनंजय भैय्या मनमाडकर तानपुरा उज्वल गजभार स्वरसाथ  शुभम बोरकर,प्रफुल्ल सोनकांबळे,यांनी सुंदर केली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर ध्वनीव्यवस्था मंडप व्यवस्था मनमाडकर परिवाराच्या वतीनं अप्रतिम करण्यात आली होती.चित्रकार भारत गदगे सरांनी लतादीदींचे व गायक नागेश आडगांवकर यांचे सुंदर स्केच रेखाटले होते ते त्यांना भेट दिले.कार्यक्रमाचे सुंदर निवेदन एन एन कुलकर्णी यांनी केले.आभार एस.पी.कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान भाऊ मनमाडकर,शुभांगीताई मनमाडकर, माधूरीताई जोशी,धनंजय मनमाडकर,एस पी कुलकर्णी,संकेत कुलकर्णी,गौरी अमळनेरकर,ज्ञानेश्वर दुधाणे,वैभव केंगार, मिलिंद जोशी,प्रवीण खडके,दुर्गेश बडवे,ज्ञानेश्वर खरात,वैभव केंगार, सुदर्शन कुंभार, सुधीर भोरकर,संगीत भिसी महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.कोरोनाच्या बऱ्याच कालावधी नंतर  सर्व रसिकाच्या चेहऱ्यावर कार्यक्रम सुंदर आयोजित केल्याची भावना दिसून येत होती.मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.