Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेत "२८फेब्रुवारी विज्ञान दिवस" मोठ्या उत्साहाने साजरा.

करकंब:- डी.ए.व्ही.शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज २८फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहा...

करकंब:-

डी.ए.व्ही.शैक्षणिक संकुल करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे आज २८फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    यावेळी थोर भौतिक शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन आदर्श व उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री.दत्तात्रय खंदारे, प्राचार्य हेमंत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे व प्राचार्य यांनी प्रशालेतील विज्ञान शिक्षक पर्यवेक्षक धनवंत करळे,मनिषा ढोबळे,प्रदीप पवार यांचा सत्कार‌ करण्यात आले.

या विज्ञान दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि विज्ञान साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विज्ञान साहित्य प्रदर्शनास विविध विज्ञान साहित्य, विज्ञान आकृतीचे रांगोळी, विविध विज्ञान पोस्टर विद्यार्थ्यांनी तयार केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. 


  यावेळी जि.प.मुली २ करकंब येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट दिले.

     प्रमुख पाहुणे खंदारे सर यांनी विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशील वृत्तीचा विकास होतो असे सांगितले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

  सर्वांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाले.