Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी प्रशालेचे सहशिक्षक महादेव पुजारी यांना गोल्ड मेडल प्रदान

अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे रविवारी आयोजित केलेल्या नैसर्गिक संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरी...

अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे रविवारी आयोजित केलेल्या नैसर्गिक संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सम्मेलनात करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल उपक्रमशील शिक्षक महादेव पुजारी यांना पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल गोल्ड मेडल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या सम्मेलनात राज्यभरातील विविध पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सम्मेलनात वन विभागानचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे,सिने अभिनेते जयराम नायर, राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र नागवडे, पुष्पाताई केवडकर,हरीविजय देशमुख, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.