Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती मुलांनी अनुभवला मराठी चित्रपट "पावनखिंड

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) केंद्र पांढरेवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करकंब मधील एस.एन.सिनेमा चित्रपट गृहामध्...

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी) केंद्र पांढरेवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करकंब मधील एस.एन.सिनेमा चित्रपट गृहामध्ये ऐतिहासिक चित्रपट "पावनखिंड"दाखवण्यात आला.ऐतिहासिक सिनेमा पाहिल्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शर्थीने खिंड.लढवली.या पाठातील.दृकश्राव्य पध्दतीने सिनेमा पाहिला गेल्यामुळे इतिहासातील हुबेहूब प्रसंग कसे असतील याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला.शिवाजी महाराजांचे मावळे जीवाला जीव देणारे होते,त्यांच्यावर मावळे आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम कसे करीत होते.लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा राहिला पाहिजे ही मावळ्यांची भावना पाहून विद्यार्थ्यांच्या अंगावर काटे उभे राहिले.अनेक वेळा जय भवानी जय शिवराय जशा घोषणांनी सिनेमागृह दणाणून गेले होते.

कधीही अस सुंदर सिनेमागृह न पाहणारी मुल आज खुपच आनंदात दिसली.सर्व पालकांनीही उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला..... असेच वरचेवर सुंदर मुलांच्या बुध्दीला चालना देणारे आनंद देणारे उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रशाला कटीबध्द आहे असा विश्वास शिक्षक ज्ञानेश्वर (माऊली) दुधाणे यांनी यावेळी दिला.