Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

जि. प. प्राथ. शाळा मुले क्र. २ करकंब येथे शालेय व्यवस्थापन समितीची सहविचार सभा संपन्न

  दिनांक 26/02/2022 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सहविचार सभा जि प प्राथ.शाळा मुले क्र 2 करकंब येथे मा श्री.आशिष खोटे (अध्यक्ष शाळा व्य...

 


दिनांक 26/02/2022 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सहविचार सभा जि प प्राथ.शाळा मुले क्र 2 करकंब येथे मा श्री.आशिष खोटे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या अध्यक्षतेखाली संम्पन्न झाली.

    शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून करकंब ग्रामपंचायतच्या सदस्या सौ कल्पनाताई सतिश देशमुख यांची निवड झाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता गोविंद वेळापूरकर यांनी सत्कार केला.सभेचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मा श्री सतिश देशमुख सर यांचा सत्कार शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आशिष खोटे यांनी केला.तसेच शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी व शिक्षणतज्ञ श्री.महालिंग कुंभार सर यांचा सत्कार प्रा.श्री.सतिश देशमुख सर यांनी केला.



शाळेतील सुका कचरा आणि ओला कचरा याचा योग्य विल्हेवात लावण्यासाठी आणि त्यापासून खतनिर्मिती करून त्या खताचा वापर शाळेतील झाडांना आणि परसबागेला व्हावा म्हणून ग्रा.पंचायत सदस्या सौ कल्पनाताई देशमुख यांनी 6 बाय 4 चा गांडूळ खत निर्मिती बेड शाळेस भेट देऊन स्वच्छता आणि टाकाऊ पासून नवनिर्मिती बाबत विचारसरणी जपून एक आदर्श निर्माण केला.

प्रा श्री सतिश देशमुख सर यांनी शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अमूल्य असे मार्गदर्शन केले आणि शाळेच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

शाळेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शाळा व्यवस्थापन समिती कटिबद्ध असल्याचे मत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आशिष खोटे यांनी व्यक्त केले.


  शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता वेळापूरकर यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नियोजनाची माहिती सांगितली. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचा घरी अभ्यास रोज निदान 1 ते 2 तास घ्यावा असे आवाहन केले.

   सभेस स्नेहल मेहेरकर, महावीर भाळवणकर,घाडगे काका वृषाली बोधे महेश गुजरे,रविंद्र शिंदे,वास्ते,मुलाणी आदी सदस्य उपस्थित होते.

  सभेचे सूत्रसंचालन रविकिरण वेळापूरकर  यांनी केले.शाळेच्या शिक्षिका सौ चंद्रकला खंदारे मॅडम यांनी सभेस उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले.