Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

दिवसा विज मिळावी यासाठी स्वाभिमानी आक्रमक,उद्या सोलापुरात अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत करणार धरणे आंदोलन.

शेतीपंपाची वीज ही दिवसपाळीने मिळावी ही गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्यांची मागणी आहे. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु ...

शेतीपंपाची वीज ही दिवसपाळीने मिळावी ही गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्यांची मागणी आहे. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी हे कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या धरणे आंदोलनास शेतकर्‍यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. स्वाभिमानीकडुन कोल्हापूरात सुरू असलेल्या या आंदोलनाचे लोन हळुहळु राज्यभर पसरताना दिसत आहे, संपुर्ण राज्यभरात ठिकठिकाणी स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांसह शेतकरी महावितरण कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन व विविध माध्यमातून निदर्शने करीत आहेत. याचाच भाग म्हणुन उद्या शुक्रवार दि.25 फेब्रुवारीला सोलापुर येथील अधिक्षक अभियंता यांचे कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना असंख्य शेतकर्‍यांसह धरणे आंदोलन करणार आहे,अशी माहिती स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दिवसा वीज मिळावी,शेतीपंपाची वीज तोडणी करू नये,जळलेले ट्रान्सफॉर्मर त्वरीत दुरूस्त करून द्यावेत या व इतर मागण्या घेवुन स्वाभिमानी हे आंदोलन करणार आहे,या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर येथील कार्यकारी अभियंता गवळी साहेब यांना स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने या मागण्यांचे निवेदन दिले. सोलापुर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनानंतर महावितरणने शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा स्वाभिमानी आक्रमक पणे मैदानात उतरेल असा इशारा यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांनी दिला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांचेसह स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष साहेबराव नागणे,युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल,जि.कार्याध्यक्ष सचिन आटकळे,जि.सदस्य कांतिलाल नाईकनवरे,मनोज गावंधरे,यशवंत बागल,अतुल गायकवाड,सचिन अ.पाटील,धनाजी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.