Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

परीट धोबी सेवा मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश ननवरे यांची निवड.

प्रतिनिधी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी आवे गावचे गणेश ननवरे यांची निवड करण्यात आली. काल पंढरपूर येथील राष्ट्रसंत...


प्रतिनिधी

महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी आवे गावचे गणेश ननवरे यांची निवड करण्यात आली.

काल पंढरपूर येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त गाडगे महाराज मठात पंढरपूर शहर व तालुका परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी विविध निवडी करण्यात आल्या यामध्ये सोलापूर जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश ननवरे यांना निवडीचे पत्र परीट धोबी सेवा मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घोडके व जिल्हा अध्यक्ष अजय सोनटक्के यांच्या हस्ते देण्यात आले.

    गणेश ननवरे हे महाराष्ट्रातील परीट समाजाच्या सर्व संघटना एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र परीट धोबी आरक्षण समन्वय समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहेत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहेत व आरक्षण समन्वय समितीच्या मध्ये सर्वात तरुण चेहरा म्हणून गणेश ननवरे यांच्या कडे पाहिलं जात आहे.

ननवरे हे पंढरपूर तालुका अध्यक्ष असताना त्यांनी समाजासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले होते आणि गावागावात जाऊन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करत होते.

महाराष्ट्रातील परीट समाजाच्या श्रेष्ठींनी अनेक जबाबदाऱ्या गणेश ननवरे यांच्या कडे दिल्या होत्या त्या जबाबदाऱ्या अतिशय उत्तम पद्धतीने पार पडल्या आहेत म्हणूनच त्यांची परीट धोबी सेवा मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल गणेश ननवरे यांच्यावर विविध स्थानातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घोडके, जिल्हा अध्यक्ष अजय सोनटक्के, युवक जिल्हाध्यक्ष राजू ननवरे, पंढरपूर शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय वरपे, मा नगरसेवक शामराव पाटोळे,संतोष घोडके, सोलापूर जिल्हा सचिव दत्तात्रय क्षिरसागर, पंढरपूर शहर युवक अध्यक्ष रामेश्वर साळुंखे,विजय वाघमारे,बाळासाहेब घोडके,.कैलास नवले,सतिश भोसले,सुनील कारंडे,वैभव ननवरे, नागेश घोडके,आप्पा राऊत,नागेश राऊत, पिंटू गायकवाड,दादासाहेब घोडके, योगेश घोडके, कांतीलाल वरपे,विशाल घोडके ,प्रशांत घोडके, उद्धव घोडके, सागर घोडके, सूनील नवले, रवी ननवरे, सिद्धू वरपे, संग्राम घोडके, प्रशांत शिंदे, रवींद्र शिंदे, नवा लोंढे, दीपक महाराज वाघमारे ,सचिन साळुंके, संजय घोडके, अरुण घोडके, सचिन घोडके,दिगंबर गायकवाड, गणेश ननवरे,तेजस घोडके व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.