Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथे मुलांच्या शिक्षणासाठी पारावरची शाळा DAV रामभाऊ जोशी हायस्कूलचा उपक्रम

करकंब..... महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे परीपत्रकानुसार १४ ते २८ जानेवारी या कालावधीत  "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" स...


करकंब.....

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे परीपत्रकानुसार १४ ते २८ जानेवारी या कालावधीत  "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" साजरा करण्यासाठी,

     दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर येथील उपक्रमशील स्काऊट शिक्षक एम.के.पुजारी सरांच्या संकल्पनेतून शिक्षक आपल्या दारी उपक्रम सुरू केले आहे..

स्मार्ट फोन नसलेल्या पालकांच्या पाल्यासाठी "पारावरची शाळा",अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आपल्या परिसरातील मंदिराच्या आवारात ही "पारावरील शाळा" हे उपक्रम सुरू केली आहे.या वेळी प्रशालेचे संगीत शिक्षक संजय पंचवाडकर, नरसिंग एबोते यांनीही विद्यार्थ्यांना माहीती सांगीतले.  या उपक्रमांमुळे त्या परिसरातील अप्रगत विद्यार्थ्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी,भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी पारावरील शाळेचे आयोजन केले आहे.प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचे मराठी भाषा ज्ञान वृद्धींगत होण्यासाठी या पंधरवड्यात परिसरातील संत सावता माळी मंदीर शुक्रवार पेठ,विठ्ठल मंदीर, महादेव मंदीर व्यवहारे गल्ली,चौंडेश्वरी मंदीर सोमवार पेठ,मगदूम बाबा मंदीर,कनकंबादेवी मंदीर या करकंब गावातील सर्व मंदीर परिसरातील प्रशालेतील विद्यार्थ्यांचे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी अध्यापन वर्ग सुरू केला आहे.

    या उपक्रमास प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक अनंत करळे,मराठी भाषा विषय  विभाग प्रमुख सुरेश दहिगीरे  यांचे ही मार्गदर्शन लाभले. सदर उपक्रम 28जानेवारी प्रर्यंत चालू असणार आहे.

*चला साजरा करू या .....*

*मराठी भाषा संवर्धन पंधरवडा*

*///माझी शाळा, माझा अभिमान///*