Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

दिग्विजय गुळमेचे यश , राज्यस्तरीय संघात निवड

    भारत हायस्कूल जेऊर येथे शिकत असलेला दिग्विजय किशोर गुळमे याने YSCL तर्फे आयोजित राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणीमध्ये अंडर 16 संघ...


    भारत हायस्कूल जेऊर येथे शिकत असलेला दिग्विजय किशोर गुळमे याने YSCL तर्फे आयोजित राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणीमध्ये अंडर 16 संघामध्ये यश संपादन केले. सदर निवड चाचणी पुणे येथे नुकतीच पार पडली .या चाचणी मधून त्याची राज्यस्तरीय संघामध्ये निवड झाली आहे .राज्यस्तरीय सामने एप्रिल मध्ये मुंबई येथे खेळले जाणार आहेत. या संघ निवडीसाठी माजी रणजीपटू उपस्थित होते. यास पुढील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .श्री. गोकुळ पाटील सर, श्री. बाळासाहेब सरक सर, श्री. निलेश पाटील सर, आणि श्री. दत्ता वाघमोडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

           या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा. श्री. नारायण आबा पाटील ,सचिव श्री. ब्रह्मदेव वाघमोडे सर, प्राचार्य श्री. केशव दहिभाते सर, श्री. एन.डी.कांबळे सर,युवा नेते पै. पृथ्वीराज (भैय्या) पाटील,करमाळा तालुक्याचे सभापती अतुल (भाऊ) पाटील,पै.श्री.सुभाष भाऊ गुळमे,प्राचार्य श्री.अनंत शिंगाडे सर, मुख्याध्यापक श्री. दीपक व्यवहारे सर, श्री.अमोल पाटील सर यांनी अभिनंदन केले.