Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पर्यावरण प्रेमी सायकलपटूंचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर पर्यावरण प्रेम सायकलपटूंना पंढरपूर सायकलर्स क्लब व  अरिहंत ऑप्टिकल यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठा...

पंढरपूर

पर्यावरण प्रेम सायकलपटूंना पंढरपूर सायकलर्स क्लब व  अरिहंत ऑप्टिकल यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर युवा नेते अँड. प्रणव परिचारक,  उद्योजक अरिहंत कोठाडिया, सौ. कोठडीया, जेंष्ठ पत्रकार सुनील उंबरे, ज्येष्ठ विधिज्ञ अमर देशमुख उपस्थित होते.

      गेल्या वर्षभरामध्ये पाच हजार पासून वीस हजार किलो मीटर पर्यत सायकलिंग करणाऱ्या सायकलिस्टचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

         देशव्यापी सायकलिंग केल्याबद्दल दिगंबर भोसले व गणपत सुंदराबाई गोपीनाथ पवार यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला तसेच पंढरपूर सायकलिंग क्लबचे सदस्य सुनील उंबरे यांच्या फोटोला देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री परिचारक यांचे हस्ते गौरविण्यात आले.

२०,००० km सायकलिंगसाठी डॉ. हणमंत दिक्षीत,  संतोष कवडे, श्रीकांत बडवे, सचिन राऊत यांचा सन्मान करण्यात आला. १०,००० km ,५,००० km  सायकलिंग करणाऱ्या सायकलपटूचा सन्मान करण्यात आला. विशेष करून श्री व सौ चंद्रराव व श्री व सौ अष्टेकर या दोन्ही पती-पत्नी यांचाही सायकलींच्या क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.


       या समारंभात पंढरपूर सायकलर्स क्लबला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन अँड प्रणवदादा परिचारक यांनी दिले.

          पंढरपूर शहर आरोग्यदायी बनवण्यासाठी सायकल चालवा निरोगी राहा असा संदेश त्यांनी दिला. यासाठी मी स्वतः ही पंढरपूर सायकलर्स क्लबच्या परिवारात सहभागी झालो आहे असे परिचारक म्हणाले. यावेळी पत्रकार श्री सुनील उंबरे व सौ.सारिका कोठाडीया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेखाताई चंद्रराव तर प्रास्ताविक प्रसिद्ध व्यापारी प्रकाश शेटे केले. कार्यक्रमाचे आभार महेश भोसले सर यांनी मानले.