Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

डाळिंब पिकावरील खोड भुंगेरा निदान आणि व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र

करकंब प्रतिनिधी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग पंढरपूर यांच्या सयुंक्त विद्यमाने राष्ट्रीय डाळिंब संश...

करकंब प्रतिनिधी

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग पंढरपूर यांच्या सयुंक्त विद्यमाने राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग पंढरपूर यांच्या सहयोगाने ची संशोधन केंद्राच्या पंचवार्षिक आढावा बैठकीच्या सदस्याची प्रक्षेत्र भेट आणि डाळिंब पिकावरील खोड भुंगेरा निदान आणि व्यवस्थापन या विषयावर पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील डाळिंब शेतकरी हेमंतकुमार नरसाळे यांच्या डाळिंब बागेमध्ये चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. विश्वनाथ तर डॉ. इंदु सावंत, डॉ. डी. पी. वासकर, वसंतराव नाईक, डॉ. राजेश कदम, डॉ. राजीव मराठे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला डॉ. ज्योत्सना शर्मा, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. आशीष मायती, डॉ. सोमनाथ पोखरे, डॉ. अवचारे, डॉ. ढमाले तर  महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंढरपुरचे सर्जेराव तळेकर, उप-विभागीय कृषी अधिकारी नागेश पाटील, कृषी अधिकारी महेश देवकाते,  आनंद ढवळे, दिनकर चौधरी, युवराज शिंदे  आणि परिसरातील डाळिंब बागायतदार उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजीव मराठे यांनी करून आयोजनाचे महत्व विषद केले. याप्रसंगी प्रगतीशील शेतकरी हेमंतकुमार नरसाळे आणि रावसाहेब गोड यांचा सन्मान डॉ. मराठे यांनी केला. यावेळी बोलताना डॉ. विश्वनाथ यांनी संशोधन केंद्राच्या कामावर समाधान व्यक्त केले आणि जास्तीत जास्त डाळिंब उत्पादकांनी संशोधन केंद्राशी संपर्कात राहून लाभ घेण्याचे आवाहन केले. उपस्थित शेतकर्यांना डॉ. वासकर यांनी डाळिंब बागेची निगा कशी राखावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डाळिंब बागासाठी असणाऱ्या कृषी विभागाच्या योजनाची माहिती श्री. तळेकर यांनी उपस्थितीनां दिली आणि खोड भुंगेरा किडीच्या बाबतीत जागरूक राहून वेळीच संशोधन केंद्रातील तज्ञ लोकांची मदत घेऊन उपाययोजना करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी डाळिंबावरील विवध बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापना बाबतीत डॉ. श्रीमती ज्योत्स्ना शर्मा यांनी माहिती दिली. तर खोड भुंगेरा किडीचेनिदान आणि व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने कसे करावे याबाबत कीड शास्त्रज्ञ डॉ. मल्लिकार्जुन यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकर्यांच्या सर्व शंकांचे समाधान उपस्थित वैज्ञांनिकांनी केले. 

या कार्यक्रमाकरिता कोविड नियमाचे पालन करत उपस्थित शेतकर्यांना मास्क व सनीटायझरचे वाटप करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ पोखरे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. निलेश गायकवाड आणि श्री मदने यांनी मानले.