Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

रामभाऊ जोशी प्रशालेचा रोहीत शेटे ग्रामीण विभागात तालुक्यात प्रथम

करकंब:-8जानेवारी  महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने आयोजित उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तिपरीक्षेत करकंब येथील डी...


करकंब:-8जानेवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने आयोजित उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तिपरीक्षेत करकंब येथील डी.ए.व्ही. शैक्षणिक संकुलचे रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब ता पंढरपूर येथील विद्यार्थी इ.8वी शिष्यवृत्ति परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

     प्रशालेने कोरोना काळातही ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांचे भरपूर सराव  शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी मिशन स्काॅलरशिप ही योजना सुरू केले.या पूर्व माध्यमिक  शिष्यवृत्तिपरीक्षेत प्रशालेतील रोहीत बाळू शेटे (74.66) गुण घेवून पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 26 वा क्रमांक मिळविला. कु.शिवानी रमेश ढोबळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत 109 व्या  स्थानी यश संपादन करून शिष्यवृत्तिस पात्र ठरले.     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील 8वी शिष्यवृत्तिपरीक्षा विभाग प्रमुख संजय पाटील(गणित व बुध्दीमत्ता),अभिषेक चोपडे(इंग्रजी),सुरेश दहिगीरे (मराठी),मनिषा ढोबळे,प्रदीप पवार,यांचे मार्गदर्शन लाभले.

    या सर्व शिष्यवृत्तिपरीक्षा गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांचे व  मार्गदर्शन शिक्षकांचे पंढरपूर शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी महारूद्र नाळे साहेब यांच्या हस्ते सत्कार व गौरव करण्यात आले.यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,केंद्रप्रमुख अप्पासाहेब माळी,मुख्याध्यापक दत्तात्रय खंदारे, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थितीत होते.

   या सर्व  शिष्यवृत्तिस पात्र विद्यार्थ्यांचे डी.ए.व्ही. शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष पद्मश्री पूनम सुरीजी,संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्राजी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.