Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

डी.ए.व्ही. रामभाऊ जोशी प्रशालेत "सावित्रिच्या लेकी" वक्तृत्व स्पर्धा संपन्न

  करकंब.....3जानेवारी.. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जि.प.शिक्षण विभाग यांच्या  आदेशानुसार करकंब येथील डी.ए.व्ही.शैक्षणिक संकु...

 


करकंब.....3जानेवारी..

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जि.प.शिक्षण विभाग यांच्या  आदेशानुसार करकंब येथील डी.ए.व्ही.शैक्षणिक संकुलात

भारतीय स्री शिक्षणाच्या जननी,क्रांतीज्योती,ज्ञानज्योती  सावित्रीमांई फुले यांच्या जयंतीनिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब येथे  सावित्रीबाईचे प्रतिमा पूजन महिला शिक्षिका व मुलीच्या हस्ते करण्यात आले.

   यावेळी पर्यवेक्षक धनवंत करळे,मनिषा ढोबळे,सुरेश दहिगीरे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्याबद्दल माहीती सांगीतली.

        प्रशालेतील मराठी विभागाच्या वतीने सुरेश दहिगीरे,एम.के.पुजारी यांच्या नियोजनाने प्रशालेत   "सावित्रिच्या लेकी" वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले.या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विनय कुलकर्णी,संजय पंचवाडकर,सुरेश दहिगीरे यांनी उत्कृष्ट परीक्षण केले. पहीले तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हेमंत कदम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

    या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,सर्व विभाग प्रमुख शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल अभंगराव,एम.के.पुजारी यांनी केले.विनय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.