Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी तानाजी जाधव तर उपाध्यक्ष पदी 'दिव्य मराठी'चे लक्ष्मण जाधव यांची निवड

प्रतिनिधी। करकंब शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलाप...

प्रतिनिधी। करकंब शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलापूर पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागार सदस्यपदी जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे यांची निवड यावेळी करण्यात आली.

अध्यक्षपदी तानाजी जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष कांबळे तसेच उपाध्यक्षपदी लक्ष्मण जाधव, सचिवपदी अशोक पवार, सहसचिवपदी तानाजी सुतकर, खजिनदारपदी सचिन दळवे, प्रसिद्धी प्रमुखपदी लिंगेश भुसनर इत्यादींची निवड करण्यात आली. तसेच पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे, शंकरराव पवार, उमेश टोमके यांचे शुभहस्ते सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, डॉ. राजेश फडे, शंकरराव कदम, गौतम जाधव, विजयकुमार गायकवाड, अनिल सोनवणे, डॉ.शिवाजी पाटोळे, नामदेव लकडे, जैनुद्दीन मुलाणी, लखन साळुंखे, धीरज साळुंखे, बाळासाहेब सावंत, शरद कारटकर, आनंद भोसले, संजय हेगडे, मुकूंद माने-देशमुख,सुदर्शन खंदारे, भारत शिंदे, स्वप्नील जाधव, गणेश देशमुख आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.